64 वर्षीय भोला यांची सायकलवर भारत यात्रा:गावागावात करतात भारतीय संस्कृतीचे प्रचार- प्रसार

5 hours ago 1
भारतीय संस्कृती फार महान आहे. भारतात असे अनेक मंदिरे आणि ठिकाणे आहेत जे अद्यापही परिचित नाही. त्यांची जगभरात ओळख व्हावी, म्हणून गुजरात येथील ६४ वर्षीय भोला बाबा यांनी भारत दर्शन यात्रा सुरू केली. यात्रानिमित्त महाराष्ट्रात अडीच महिन्यांपासून आहे. अजिंठा येथे त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बातचीत केली. या वेळी भोला महाराज म्हणाले की, मानसरोवर येथून मी सन २०१७ पासून यात्रेला सुरुवात केली. सात वर्षांपासून ही यात्रा सुरू असून तीन वर्षांपासून सायकलवर यात्रा करतोय. सायकलवर यासाठी करतोय की, भारतात अनेक संस्कृती साईट डोंगरदऱ्यात आहे. तिथे पोहोचवणे शक्य होते. असाच भारत दर्शन करता करता कर्नाटक येथे हाथर संगम, कुणाल संगम आहे तिथे २१०० वर्षे जुने मंदिर डोंगराखालून निघाले. शिवलिंग मंदिर आणि हे शिवलिंग मनुष्यरुपी आहे. तिथे एकही अभिषेक केला की ३६० दिवस अभिषेक केल्यासारखे असल्याचे महत्त्व आहे. याची माहिती कोणाला आहे का, अशी महान संस्कृतीची ओळख जगभर पसरविण्यासाठी आम्ही सायकल यात्रा करतो. भारतीय संस्कृती एवढी विशाल आहे की, तिची भ्रमण व माहिती घेण्यासाठी पाच मनुष्यरूप जन्म लागेल तेव्हा ती पूर्ण होईल, असेही भोला महाराज यांनी बोलताना सांगितले. भारत यात्रेतून संस्कृतीचे दर्शन आतापर्यंत भोला महाराज यांनी विविध राज्ये सर केली असून यातून ज्या-त्या भागातील संस्कृतीची माहिती घेऊन तेथे इतर राज्यातील भारतीय संस्कृतीचा प्रचार व प्रसार ते नियमित भ्रमंतीत करतात. तीन वर्षांपासून सायकलवर सायकलवर पस्तीस राज्य केले पार करत भोला हेही यात्रा पूर्ण करत आहेत. यादरम्यान त्यांनी भारतातील आतापर्यंत ३५ राज्य पार केले. यात गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तराखंड, बिहार, झारखंड, बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ असे जवळपास राज्य यांनी सायकलवर पार केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article