75 वर्षाचे आजी आजोबा रमले बालपणात:जुन्या आठवणी- खेळ अन् धमाल अनुभवला, गंमती जमती व आठवणींना उजाळा

6 hours ago 1
सोलापूर चकारवच्ची, चिठ्ठ्या आपडी तुपडी, मैदानी खेळ बौद्धिक खेळ अशा एक ना अनेक खेळांची आठवण करत खेळ खेळून जुन्या गप्पा गाण्यांचा नृत्याचा आनंद ७५ वर्षांच्या आजी आजोबांनी घेतला. निमित्त होते बालदिनाचे. पद्मकमळ प्रतिष्ठान व श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्या वतीने आगळावेगळा उपक्रम झाला. यावेळी क्रिकेट, विटी दांडू, गोट्या, पतंग, गष्टा-पाणी, गजगे, व निवडक खेळांचा सहभाग होता. ७५ वर्षाचे आजीआजोबा रमले पुन्हा बालपणात जुन्या आठवणी खेळ अन धमाल अनुभवला. फाउंडेशन व सखी संघमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला होता. पद्मकमळचे गोपीकृष्ण वड्डेपल्ली यांनी आठवणींना उजाळा दिला. सखी संघमच्या अध्यक्षा मेघा इट्टम यांनी प्रास्ताविक केले. दयानंद कोंडाबत्तीनी, प्रा. कृष्णात देवकर, छत्रपती केने, स्नेहल शिंदे यांच्यासह सहभागी सर्वांनी आपापल्या आठवणी व लहानपणाच्या किस्से सांगितले. यांनी घेतले परिश्रम श्रीनिवास रच्चा, किशोर व्यंकटगिरी, कविता मंगलपल्ली, वैशाली व्यंकटगिरी, पद्मावती संगा, रेणुका चिंता यांच्यासह सखी संघमच्या उपाध्यक्षा मंजुळा आडम, समन्वयिका कला चन्नापट्टण, वनिता सुरम, पद्मा मेडपल्ली, पल्लवी संगा, हेमा मैलारी, विद्या श्रीगादी उपस्थित होते. रमेश कंदीकटला यांनी परिश्रम घेतले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article