Akola: न्यायालय परिसरात वाद्य वाजविले, गुन्हा दाखलfile photo
Published on
:
28 Nov 2024, 2:57 pm
Updated on
:
28 Nov 2024, 2:57 pm
अकोला : अकोट शहरातील न्यायालय परिसरात प्रतिबंध असतानाही वाद्य वाजविल्यामुळे एका बँड पथकावर शहर पोलिसांनी 27 नोव्हेंबर ला गुन्हा दाखल केला आहे. लग्नानिमित्ताने पोपटखेड मार्गावरून बँड पथकाद्वारे वाद्य वाजविणे सुरू होते.
त्याचवेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या दालनात एका प्रकरणात सुनावणी सुरु होती. बँड पथकास बैंड वाजविणे बंद करण्यात यावे, असे सांगितले होते. मात्र तरी सुध्दा त्यांनी बंद न करता वाद्य वाजविणे सुरूच ठेवले. वाद्य वाजविणारे मनोहर अण्णाजी कासार व सुधाकर विश्वनाथ बावणे दोघेही रा. अण्णाभाऊ साठे नगर अकोट या दोघांना वाद्य वाजविण्याबाबत परवाना विचारला असता त्यांनी कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. यावरून अकोट शहर पोलिस स्टेशनचे गजानन प्रितम देवकर यांनी मनोहर बैंड पार्टी चे मालक व त्यांच्या पथकाची शहर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली.
न्यायालय परिसरात वाद्य वाजविण्यास प्रतिबंध असतानाही संबंधितांनी कर्कश आवाजात वाद्य वाजवून आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी दोघांविरूध्द कलम ३२३, ३ (५), भा. न्या. सं. ची कायदेशीर कारवाई केली आहे.