Akola: पातूर नगरीतील ऐतिहासिक नवरात्रोत्सव; माझी रेणुका माउली कल्पवृक्षाची सावली

3 hours ago 1

Akola:- पातूर शहर रेणुका मातेची ही पवन पातूर नगरी सुवर्णनगरी म्हणून ओळखण्यात येते. रेणुका माता संपूर्ण तालुक्याचे आराध्यदैवत आहे. आपले पातूर एक ऐतिहासिक शहर ऐतिहासिक नगरी ऐतिहासिक पुरातन वास्तूचा खजिना आहे नैर्गिक सानिध्यात असलेलं गाव आहे.

माझी रेणुका माउली कल्पवृक्षाची सावली

प्रत्येक वर्षी हर्षोल्हासात साजरा होणारा उत्सव नवरात्र दिनांक 3/१०/२०२४ पासून सुरू होत आहे. ऐतिहासिक नगरी जी पातुर एक ऐतिहासिक शहर नावाने ओळखली जाते येथील रेणुका माता संस्थान येथे शारदीय नवरात्र उत्सवाला (Navratri festival) सुरुवात होत आहे. पंचक्रोशीत राहणान्या नागरिकाचे आराध्यदैवत रेणुका माता, रेणुका माउली कल्पवृक्षाची सावली रेणुका मातेच्या गडावर जाताना मनमोहक निसर्गरम्य वातावरण अनुभवायला मिळते सुवर्णा नदीच्या काठी असलेल्या निसर्गाच्या सानिध्यात असलेला टेकडीवर रेणुका मातेचे मंदिर आहे रेणुका मातेच्या मंदिरावर जात असताना सुमारे २४० पायऱ्या असून आबालवृद्धांना पण जाता यावे यासाठी दोन्ही कडून स्टीलचे रोलिंग लावले आहेत गडावर चढताना प्रथमता रेणुका माता मंदिराचे व्यवस्थापक स्वर्गीय दिनानाथ महाराज यांची समाधी लागते रेणुका मातेच्या टेकडीवर राम दत्त अनुसया माता महादेव कृष्ण हनुमान यांचे मंदिर असून रेणुका मातेच्या गडावर जाताना संपूर्ण शहराचे विहंगम दृष्य अनुभवायला मिळते गडावर दृष्टी टाकल्यास
मंदिरे आहेत.

निसर्गाचे सौंदर्य तथा स्वच्छता पाहून एक वेगळीच अनुगूती अनुभव्हायला मिळते

टेकडीवर पोचताच मनाला शांती मिळते मंदिर (Temple)परिसरात असलेलं रम्य वातावरण निसर्गाचे सौंदर्य तथा स्वच्छता पाहून एक वेगळीच अनुगूती अनुभव्हायला मिळते रेणुका माता नवसाला पावणारी आहे अशी या ख्याती आहे नवसाला पावणारी माता रेणुका अशी श्रद्धाळू ची श्रद्धा आहे.
भक्ताची मांदियाळी दाही दिवस मंदिरावर असते नवरात्रात देवीची आरती सकाळी व संध्याकाळी सहा वाजता असते पंचक्रोशीतील भक्त खूप मोठ्या संखेत आरतीसाठी भक्त येतात, मंदिर परिसरात मुलांसाठी आली. घसरगुंडी व विविध खेळणी आहेत, शुद्ध पाण्याची सोय प्रसाधनगृहे उपलब्ध आहेत टेकडीवरून संपूर्ण पातुर शहराचे विहंगम दृश्य दिसते. दक्षिणेकडे संत शहा बाबू यांचा दर्गा तर उत्तरेकडे ऐतिहासिक पुरातन नानासाहेबांचा वाडा दिसतो गडाच्या खाली पूर्वेस गायत्री मातेचे मंदिर असून लगतच प्रसिद्ध तपे हनुमान मंदिर आहे, नवरात्रौत्सवात पंचक्रोशीतील भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात .

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article