-रवींद्रसिंह परदेसी परभणी पोलीस अधीक्षक
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त
परभणी (Assembly Elections) : जिल्ह्यात सायबर पोलीस ठाणे सोबतच सर्व पोलीस यंत्रणा आणि आता निवडणूक प्रक्रियेमुळे विशेष सायबर पथकांची स्थापना केली आहे. त्याद्वारे आता प्रत्येक मोबाईल धारकाच्या वापरावर करडी नजर ठेवली जाणार आहे. कोणत्याही प्रकारच्या पोस्ट, व्हिडीओ आणि आक्षेपार्ह मजकूर कोणीही प्रसारित करू नये. आचारसंहितेचा भंग होईल अशा बाबी केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
– रवींद्रसिंह परदेशी, पोलीस अधीक्षक
जिल्ह्यात समाज माध्यमाचा वापर सर्वसामान्य नागरिक तसेच मतदार यासह प्रत्येकाकडून केला जातो. समाज माध्यमाचा वापर करताना प्रचार कालावधी संपल्यानंतर मतदान आणि नंतर होणारी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रत्येकाने सावधानता बाळगणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या सामाजिक तसेच राजकीय आणि जातीय तेढ निर्माण होतील अशा पोस्ट, व्हिडीओ व्हायरल करणे टाळावे असे आवाहन पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.