Published on
:
18 Nov 2024, 4:11 am
Updated on
:
18 Nov 2024, 4:11 am
नाशिक : रेल्वेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे 'मिशन झीरो डेथ'अंतर्गत प्रवाशांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. मध्य रेल्वेने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे २०२३ च्या तुलनेत यंदाच्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या काळात डेथची ३६७ प्रकरणे कमी निदर्शनास आली असून, ही घट १४ टक्के आहे. गेल्या वर्षी या कालावधीत २७५५ प्रकरणे समाेर आली असून, चालू वर्षी हे प्रमाण २३८८ प्रकरणापर्यंत सीमित आहे. (Mission Zero Death)
भारतीय रेल्वे ही देशाची लाइफलाइन आहे. दरवर्षी कोट्यवधी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. पण, गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे गाडीतून रुळावर पडल्याने तसेच रेल्वे रुळावरून जात असताना हजारो प्रवाशांना प्राणाला मुकावे लागले. शेकडो जणांना तात्पुरते किंवा कायमचे अपंगत्व आले. त्यामुळेच अशा घटना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध पावले उचलण्यात येत आहे. या प्रयत्नांना दिवसेंदिवस यश लाभत असल्याचे पाहायला मिळते आहे.
मध्य रेल्वेने राबविलेल्या 'मिशन झीरो डेथ'अंतर्गत जानेवारी ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत १ हजार ३५२ प्रवासी जखमी होण्याचे प्रकरणे घडली होती. २०२४ मध्ये याच कालावधीत ही प्रकरणे १४१ कमी झाली यंदा १ हजार २११ प्रकरणे निदर्शनास आली. त्यामुळे गतवर्षीशी तुलना केल्यास १० टक्क्यांनी हे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान, मृत्यू व जखमींची एकत्रित संख्या बघता गेल्या वर्षीशी तुलना केल्यास ५०८ प्रकरणांनी घट झाली असून, हे प्रमाण १३ टक्के आहे. म्हणजेच २०२३ मध्ये एकूण ४ हजार १०७ प्रकरणे निदर्शनास आली. २०२४ मध्ये ३ हजार ५९६ प्रकरणे समोर आली.
2024 मधील जखमी व मृत्यूच्या घटना
रेल्वे ट्रॅकवर अनधिकृत वावर : १४२९
चालत्या रेल्वेतून पडणारे : ६५
फलाट व ट्रेनमधील अंतरात पडणे : ९१
अन्य कारणांनी : १४२३
एकूण : ३५९६
अनधिकृत प्रवेशाच्या नियंत्रणासाठी ठराविक ठिकाणी रेल्वे सुरक्षा दल कर्मचारी नेमणे
भागात सीमा सुरक्षा भिंती बांधणे (मुख्यतः उपनगरी भाग, विशेषत: मुंबई विभागात)
रेल्वे हद्दीवरील रेल्वे रुळाजवळची अतिक्रमणे हटवणे
रेल्वे कायद्याच्या १४७ अन्वये दंडात्मक कारवाईची नोंद करणे
फलाट संपण्याच्या ठिकाणी कुंपण घालणे
फलाटाचे रुंदीकरण
नवीन फलाट, भुयारी मार्ग, पुलांचे बांधकाम
रुळ ओलांडू नये म्हणून एस्केलेटर व लिफ्ट.
मुंबई विभागात गर्दी टाळण्यासाठीी कार्यालयांचा वेळा बदलणे
समाजमाध्यमांद्वारे प्रवाशांच्या विचार करण्यावर प्रभाव पाडणे