भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया
नागपूर (Chandrasekhar Bawankule) : महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या एक दिवस आधी, तापलेल्या राजकीय वातावरणात, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते विनोद तावडे (BJP person Vinod Tawde) यांच्याशी संबंधित एक वाद समोर आला. (Maharashtra Election 2024) मतांसाठी रोख रक्कम वाटल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. मात्र, गदारोळ होऊनही भाजप नेते तावडे यांनी हे आरोप बिनबुडाचे म्हणत फेटाळून लावले. या प्रकरणावर भाजप प्रदेशाध्यक्ष (Chandrasekhar Bawankule) चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेजी (Vinod Tawde) हे नालासोपारा, वसई विरार भागात कार्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी कसे काम करावे, मतदानाचा टक्का कसा वाढेल ,बोगस मतदान कसे थांबावे, या बैठक घेत असताना विरोधकांनी षडयंत्र केले आणि जाणीवपूर्वक पूर्वनियोजित असे षडयंत्र होते, अशी प्रतिक्रिया (Chandrasekhar Bawankule) त्यांनी दिली.
BJP person Vinod Tawde was reportedly caught with ₹5 crore currency successful a edifice successful Vasai.
It is said helium was giving it to enactment workers to administer among voters.@ECISVEEP, volition you instrumentality enactment oregon conscionable disregard this unfastened violation? pic.twitter.com/b4vmweOlph
— Congress Kerala (@INCKerala) November 19, 2024
विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यावर आरोप करण्यात आले, विनोद तावडे हे कोट्यवधी रुपये घेऊन आले आणि कोट्यावधी रुपये वसई विरार आणि नालासोपारा भागात वाटणार आहेत. विरोधकांनी एक फिल्म तयार केली. विरोधकांनी मीडिया मॅनेजमेंट केले आणि विनोद तावडेजी यांना षडयंत्र पुर्वक गोवण्यात आले. विनोद तावडे राष्ट्रीय महासचिव आहेत आणि त्या पदावर असलेले व्यक्ती अशा प्रकारे पैसे वाटप करतील का ? याचा विचार केला पाहिजे.
खरे तर विरोधकांच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे. निवडणूक हातातून गेलेली आहे, म्हणून भारतीय जनता पक्ष आणि (Vinod Tawde) विनोद तावडे यांना बदनाम करण्याचा प्रकरण आहे. तापस यंत्रणेने याबद्दल दखल घेतली आहे. तपास यंत्रणा याचा तपास करेल, पण भारतीय जनता पक्ष म्हणून, आम्ही या षडयंत्राचा पर्दा फाश करू. तावडे निष्कलंक आहेत, त्यांच्यावरती जे आरोप झाले ते आरोप चुकीचा आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष (Chandrasekhar Bawankule) चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.