बालसंगोपन योजनेसाठी आधार सिडींग करण्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजाभाऊ मगर यांचे आवाहन
हिंगोली (Childcare Yojana) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेसाठी बालकांचे बँक खाते आधार सिडींग करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजाभाऊ मगर यांनी केले आहे. या योजनेच्या लाभासाठी पात्र असलेल्या व लाभ सुरु असलेल्या बालकाचे वय १० वर्षाच्या आत असल्यास त्या बालकांचे त्यांच्या पालकांसोबत संयुक्त बँक खाते उघडून सदर खात्याशी बालकांचा आधार क्रमांक डीबीटी, सिडींग करावा. तसेच ज्या बालकांचे वय १० वर्षापेक्षा जास्त आहे अशा बालकांचे स्वतंत्र बँक खाते उघडून आधार क्रमांक सिडींग करावा.
बालकांचा आधार क्रमांक बँक खात्याशी सिडींग नसल्यास या योजनेचा लाभ जमा होणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच जर (Childcare Yojana) बालकांचे स्वतंत्र खाते किंवा त्यांचे पालकांसोबत संयुक्त बँक खाते पूर्वीपासूनच उघडलेले असतील तर ते खाते सद्यस्थितीत चालू आहे की बंद आहे याची खात्री करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बालसंगोपन योजनेकरीता (Childcare Yojana) पात्र असलेल्या व लाभ सुरू असलेल्या बालकांचे १० वर्षाच्या आत वय असल्यास त्यांच्या पालकांसोबत संयुक्त बँक खाते उघडून सदर खात्याशी बालकांचा आधार क्रमांक, डिबीटी सिडींग करणे आवश्यक आहे. तसेच ज्या बालकाचे वय १० पेक्षा अधिक आहे त्यांचे स्वतंत्र बँक खाते उघडून आधार क्रमांक सिडींग करणे गरजेचे आहे.