Samoa U 19 Womens World Cup 2025Image Credit source: Matthew Lewis-ICC/ICC via Getty Images
अंडर 19 वूमन्स टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत अनेक विक्रम झाले आहेत. या स्पर्धेत बुधवारी 22 जानेवारील 19 व्या सामन्यात सी ग्रुपमधील 2 संघ आमनेसामने होते. न्यूझीलंड विरुद्ध सामोआ यांच्यात ओल्या खेळपट्टीमुळे 20 ऐवजी 17 षटकांचा खेळ करण्यात आला. न्यूझीलंडने हा सामना 67 धावांनी जिंकला. न्यूझीलंडचा हा या स्पर्धेतील पहिला विजय ठरला. दुर्देव असं की सामोआच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. सामोआच्या फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले.
न्यूझीलंडने 17 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 107 धावा केल्या. त्यामुळे सामोआला 108 धावांचं आव्हान मिळालं. सामोआची विजयी आव्हानाचा पाठलाग करताना घसरगुंडी झाली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सामोआला सुरुवातीपासून ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे सामोआच्या एकाही फलंदाजाला मैदानात टिकता आलं नाही. तसेच एकालाही 10 हा आकडा गाठता आला नाही.
सामोआकडून एका फलंदाजाने सर्वाधिक 8 धावा केल्या. तिघींनी प्रत्येकी 6-6 धावा जोडल्या. दोघींनी 1-1 धाव केली. तर इतर दोघींनी प्रत्येकी 2-2 धावांचं योगदान दिलं. तर तिघींना भोपळाही फोडता आला नाही. न्यूझीलंडने अशाप्रकारे सामोआला 14.2 ओव्हरमध्ये 40 धावांवर गुंडाळलं. न्यूझीलंडने अशाप्रकारे हा सामना जिंकला.
न्यूझीलंडचा पहिला विजय
दरम्यान न्यूझीलंडचा हा साखळी फेरीतील पहिला विजय ठरला. न्यूझीलंडला पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 22 धावांनी पराभूत केलं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात नवख्या नायजेरियाने न्यूझीलंडचा 2 धावांनी धुव्वा उडवत मोठा उलटफेर केला. तर न्यूझीलंडने तिसऱ्या आणि साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात विजयाचं खातं उघडलं.
न्यूझीलंड अंडर 19 वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : टॅश वेकलिन (कर्णधार), एम्मा मॅकलिओड, केट इरविन, केट चांडलर, अनिका टॉड, इव्ह वोलँड, डार्सी रोझ प्रसाद (विकेटकीपर), हन्ना ओकॉनर, सोफी कोर्ट, ऋषिका जसवाल आणि लुईसा कोटकँप.
सामोआ अंडर 19 वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : टॅश वेकलिन (कर्णधार), एम्मा मॅकलिओड, केट इरविन, केट चांडलर, अनिका टॉड, इव्ह वोलँड, डार्सी रोझ प्रसाद (विकेटकीपर), हन्ना ओकॉनर, सोफी कोर्ट, ऋषिका जसवाल आणि लुईसा कोटकँप.