या आठवड्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिला दिलासा दिला. या आठवड्यात सोने 1300 रुपयांनी उतरले. तर चांदीत 5 हजारांची घसरण झाली. गेल्या 15 दिवसांत सोने 5 हजारांनी तर चांदी 11 हजारांनी उतरली. सोने-चांदीच्या किंमती धपकन आपटल्या. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला. जागतिक बाजारात अमेरिकन धोरण बदलाचा लागलीच परिणाम दिसून आला. सोने आणि चांदीत अजून घसरणीचे संकेत मिळत आहेत. डॉलर मजबूत होत असल्याने कच्चे तेल आणि इतर वस्तू महागण्याची शक्यता आहे. शेअर बाजार, क्रिप्टो, रिअल इस्टेटमध्ये तेजीचे सत्र येण्याची शक्यता आहे. अजून ट्रम्प यांची नवीन धोरणं समोर यायला वेळ आहे. पण बाजाराने मूड बदलला आहे. किंमती कमी झाल्याने सराफा बाजारात ग्राहकांची तोबा गर्दी उसळली आहे. आता सराफा बाजारात अशा आहेत या धातुच्या किंमती (Gold Silver Price Today 17 November 2024 )
सोन्यात 1300 रुपयांची स्वस्ताई
या आठवड्यात सोन्याची किंमत 1300 रुपयांनी कमी झाली. 11 नोव्हेंबरला 600 रुपये, मंगळवारी 147 रुपयांनी तर 13 नोव्हेंबर रोजी 440 रुपयांनी सोने स्वस्त झाले. गुरुवारी 120 रुपयांनी भाव उतरला तर शुक्रवारी जवळपास तितकीच वाढ झाली. शनिवार भाव स्थिर होता. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 69,600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,910 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
हे सुद्धा वाचा
चांदीचा मोठा दिलासा
मागील आठवड्यापासून चांदीने नरमाईचा सूर आळवला आहे. या आठवड्यात चांदी 5 हजारांनी उतरली. 11 नोव्हेंबर रोजी 1 हजारांनी, मंगळवारी चांदी 2 हजारांनी तर 14 नोव्हेंबर रोजी चांदी 1500 रुपयांनी चांदी स्वस्त झाली. दोन दिवसात भावात कोणताच बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 89,500 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 73,739, 23 कॅरेट 73,444, 22 कॅरेट सोने 67,545 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 55,304 रुपये, 14 कॅरेट सोने 43,137 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 87,103 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.