हिंगोली (Hingoli):- एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank)सीएसआर निधीमधून औंढा नागनाथ तालुक्यातील २१ गावांमध्ये ‘पर्यावरण समतोल’ कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्याअंतर्गत ‘माती आणि पाणी संवर्धन तसेच शाश्वत शेती’ इत्यादी कामे केली जातील. या प्रकल्पाचा शुभारंभ कार्यक्रम ७ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन ‘दिलासा जनविकास प्रतिष्ठान’ ने केले होते.
एचडीएफसीचा संयुक्त उपक्रम
हिंगोली जिल्ह्यातील औढा नागनाथ या तालुक्यातील विविध २१ गावांच्या शाश्वत विकासासाठी विविध कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिलासा जनविकास प्रतिष्ठान आणि एचडीएफसी बँकेने यासाठी पुढाकार घेतला असून बँकेच्या सीएसआर निधीअंतर्गत ‘पर्यावरण संवर्धन आणि समतोल’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे गावांच्या शाश्वत विकासाचे ध्येय समोर ठेवून विविध कार्यक्रमांची रूपरेषा आखण्यात आली असून त्याअंतर्गत २१ गावांमध्ये ‘माती आणि पाणी संवर्धन व त्यातून शाश्वत शेती’ ची मूलभूत कामे केली जाणार आहेत. या कामांचा शुभारंभ दिलासा संस्थेचे सचिव संजीव उन्हाळे संस्थेच्या उपाध्यक्षा वैशाली खाडिलकर आणि एचडीएफसी बँकेचे सुजया शेट्टी विभागीय व्यवस्थापक विनीत जाधव व एच डी एफ सी बँकेचे विभाग प्रमुख अंकित व एचडीएफसी हिंगोली बँकेचे मॅनेजर प्रशांत संगेवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी .दिलासा संस्थेचे संजीव उन्हाळे सर व अंकित सर व विनीत जाधव सर यांनी चांगले प्रकारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी दिलासाचे कर्मचारी, सय्यद मुमताज सर.सुभाष सवडे. सतीश सोनुने. असिफ अन्सारी. प्रणव उन्हाळे. कृषिदूत हजर होते. यावेळी गावांचे या सरपंच, सुदाम खोकले सर उपसरपंच, तुकाराम काशीदे सोसायटी चेअरमन मारुती बेले मा. सरपंच दत्तराव ठोंबरे पंचायत समिती सदस्य शेख बुराण व लक्ष्मण कोरडे तमराव बर्गे इतर गावातील सरपंच उपसरपंच पण उपस्थित होते गावकरी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.