Kala Ghoda Art Festival – भन्नाट संकल्पना, कलाप्रेमींची गर्दी; रौप्य महोत्सवी काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल

2 hours ago 2

नवोदित आणि प्रतिभावंत कलावंतासाठी पर्वणी असणारा काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल कलाप्रेमींच्या गर्दीत सुरू आहे. कलाकारांच्या भन्नाट कल्पनेतून साकारलेल्या सृजनशील कलाकृती कलारसिकांचे आकर्षण ठरत आहेत. महोत्सवाचे यंदाचे 25 वे वर्ष आहे.

काळा घोडा असोसिएशनतर्फे दरवर्षी काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. महोत्सवाची सुरुवात 1999 साली झाली. तेव्हापासून देशविदेशात या आर्ट फेस्टिव्हलचा डंका आहे. यंदा 2 फेब्रुवारीपर्यंत महोत्सव सुरू राहणार आहे. बांबू आणि स्टीलच्या बाटल्यांची कलात्मक मांडणी करून महोत्सवाचे प्रवेशद्वार, भंगारापासून तयार केलेल्या घोडय़ाच्या प्रतिकृतीसह काचेच्या तुकडय़ांपासून नक्षीकाम केलेली घोडय़ाची प्रतिकृती, प्रवेशद्वारालगतची चारचाकीची प्रतिकृती खास आकर्षण ठरल्या आहेत. काळा घोडा महोत्सवात महानगरपालिकेचे बचत गटांसाठी स्टॉल्स आहेत.

  • रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने काळा घोडा असोसिएशनने या वर्षी ‘सिल्व्हर घोडा’ ही थीम निवडली आहे.
  • लाईव्ह परफॉर्मन्सच्या चाहत्यांसाठी वाय. बी. चव्हाण थिएटर येथे मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती आणि बंगाली भाषेतील 35 हून अधिक नाटके सादर होणार आहेत.

चित्रनगरीचा सिल्व्हर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा

काळा घोडा महोत्सवात यंदा दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने ‘सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा’ साकारण्यात आला आहे. सिनेनिर्मितीसाठी लागणाऱया तांत्रिक टाकाऊ साहित्यातून हा घोडा तयार करण्यात आला असून हा घोडा म्हणजे प्रत्येक कलाकाराला कलाकारांनी दिलेली ही मानवंदना आहे. शिल्पाच्या निर्मितीसाठी लागणारे सर्व साहित्य हे तांत्रिक टाकाऊ वस्तू आणि पर्यावरणपूरक साहित्याच्या वापरातूनच उपलब्ध करण्यात आले आहे. डॉ. सुमित पाटील यांनी या शिल्पाचे कला दिग्दर्शन केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article