Published on
:
21 Nov 2024, 12:00 pm
Updated on
:
21 Nov 2024, 12:00 pm
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात विधानसभेसाठी या वेळी विक्रमी मतदानाची चिन्हे आहेत. सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या ५८.५९ टक्के मतदानाच्या आकडेवारी पाहता सायंकाळी सहापर्यंत ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, चारही मतदारसंघात चुरशीने मतदान झाले. तुळजापुरात सर्वाधिक मतदान झाले.
धाराशिव जिल्ह्यातील उस्मानाबाद, उमरगा, परंडा आणि तुळजापूर या चार मतदारसंघांतून एकूण ६६ उमेदवार रिंगणात आहेत. चारही मतदारसंघात दुरंगी लढती होत असल्याने बुधवारी सकाळपासूनच बहुतांश मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. अनेक भागात तर दुपारी तसेच सायंकाळीही उशिरापर्यंत मतदारांची गर्दी होती. उस्मानाबाद मतदारसंघात ५६.२२, परंडा मतदारसंघात ५७.७०, तुळजापूर मतदारसंघात ६२.२६ आणि उमरगा ५७.८८ टक्के मतदान सायंकाळी पाचपर्यंत झाले होते. अंतिम आकडेवारी रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही.