परभणी (Manvat Police Case) : छत्रपती संभाजी नगर येथून संचित रजेवर आलेला एक २८ वर्षीय कैदी बेपत्ता झाला आहे. या बाबत मानवत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार शमशोद्दिन शेख यांनी तक्रार दिली आहे. उमेश बाबु मगर हा कैदी कारागृहातून संचित रजेवर आला होता. रजा संपल्यानंतर सदर कैदी कारागृहात हजर राहणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता कैदी बेपत्ता झाला. या बाबत (Manvat Police Case) मानवत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. घोरपडे करत आहेत.
नालीच्या पाण्यावरुन वाद
परभणी : तुझ्या नालीचे पाणी आमच्या दारासमोर येत आहे, असे म्हणत वाद घालत एकाला मारहाण करुन शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना गंगाखेड तालुक्यातील कोद्री येथे घडली. या प्रकरणी १७ नोव्हेंबरला गुन्हा नोंद झाला आहे. पुष्पा सावंत यांच्या तक्रारीवरुन मारोती सावंत, सत्यशिला सावंत, अमर सावंत यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.