सिडको : पाणी पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी रायगड चौकात ठिय्या आंदोलन करणारे महिला व नागरिक व त्यांच्याशी संवाद साधताना सुधाकर बडगुजर.(छाया : राजेंद्र शेळके)
Published on
:
03 Feb 2025, 7:07 am
Updated on
:
03 Feb 2025, 7:07 am
सिडको : धरणांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असतानाही पाणीपुरवठा विभागातील अधिकारी यांच्या निष्काळजी पणामुळे सिडको तील काही भागात पाणी समस्या निर्माण झाली आहे. सिडकोतील रायगड चौक भागात पाणी पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी नागरिक व महिलांनी रायगड चौक या ठिकाणी सोमवारी (दि.3) सकाळी साडे आठ वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन पाणीपुरवठा अधिकारी यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले .
गेल्या कित्येक दिवसापासून सिडकोतील रायगड चौक परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अद्यापही येथील पाणी समस्या कायम आहे.
अधिकारी व पाणी सोडणारे वॉलमन यांची अरेरावी भाषा या मुळे महिलांमध्ये संतापाची लाट उसळली होती. पाणी पुरवठा सुरळीत करावा यासाठी सोमवारी (दि.3) सकाळी साडेआठ वाजता रायगड चौक येथील नागरिक शेकडो महिलांनी मोर्चा काढत रायगड चौक या मुख्य रस्ताच्या ठिकाणी रस्ता रोको ठिय्या आंदोलन करण्यात आला या वेळी काही काळासाठी येथील वाहतूक बंद करण्यात आली होती. रस्ता रोको आंदोलना मुळे दुतर्फा वाहनांची मोठया प्रमाणात रांग लागली आहे.
यावेळी पोलिसांचा मोठा फौज फाटा या ठिकाणी दाखल झाला असून आंदोलनाची माहिती समजताच प्रभागाचे माजी नगरसेवक ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर घटनास्थळी दाखल झाले, त्यानंतर पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता ए जे काझी देखील दाखल झाले आहेत. पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता ए जे काझी यांनी पाणी पुरवठा दुपारीपर्यंत सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे. रायगड चौक परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक राहतात. महापालिकेची नियमित घरपट्टी व पाणीपट्टी भरत आहेत. मनपाने या भागात पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा राजीव गांधी भवन येथे महिलांचा हंडा मोर्चा काढला जाईल. असा इशारा योगेश गांगुर्डे, अमोल डावखर, चारुलता बऱ्हाटे, मेघराज आहिरे, सुशील नाईक, निखिल भारते, नारायण जाधव यांसह महिला व नागरिक सहभागी झाले.
रायगड चौक येथे पाण्याची समस्या निर्माण झाली असून मनपा सिडको पाणीपुरवठा विभागाने पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिकारी यांना सांगितले आहे.
सुधाकर बडगुजर, माजी नगरसेवक, ठाकरे गट शिवसेना जिल्हाप्रमुख.
रायगड चौक येथील पाणीपुरवठा करणाऱ्या व्हाल्व्हमनची नागरिक व महिलांनी तक्रार केल्यानंतर या भागात नवीन व्हाल्व्हमन नियुक्ती करण्यात येणार आहे. या भागातील पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल.
ए जे काझी उपअभियंता, पुरवठा विभाग, सिडको मनपा
पाणी पुरवठा अधिकारी यांनी या भागातील पाणी पुरवठा सुरळीत केला नाहीतर अधिकारी यांच्या तोंडाला काळे फासण्याचे आंदोलन करणार आहे.
योगेश गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते