उद्या पार पडणार पुसद विधानसभा निवडणुकीच्या मतदान
पुसद (Pusad Assembly Elections) : पुसद विधानसभा मतदारसंघ -81 करिता आज 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून ग्रामीण भागातील मतदान केंद्रावरील मतदान अधिकारी व त्यांचे पथक 19 नोव्हेंबर रोजी येथील यशवंत रंगमंदिर परिसरातील मैदानावरून निवडणूक साहित्य घेऊन रवाना होत होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महादेवराव जोरवर व इत्यादी झोनल अधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांचे पथक यांना साहित्य घेऊन मतदान केंद्रावर रवाना करीत होते.
तीन लाख 18 हजार च्या पुसद विधानसभा मतदारसंघ -81 मध्ये मतदार आहेत . यावेळी दिव्यांग मतदारांचे मतदान पार पडण्याकरिता मतदान केंद्रावर विशेष सोय करण्यात आलेली आहे. तर वृद्ध नागरिकांचे मतदारांचे मतदान या अगोदरच पार पडले आहे. तर निवडणुकीच्या कर्तव्यावर आलेले निवडणूक अधिकारी, पोलीस कर्मचारी महिला कर्मचारी इत्यादींचे टपाली मतदान पार पडले. लोकशाहीच्या निवडणूक रुपी उत्सवामध्ये मतदारांनी निर्भयपणे बाहेर पडून जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मतदान करावे मतदानाची टक्केवारी कशी वाढेल यासाठी सर्वांनीच अथक प्रयत्न करणे गरजेचे आहे.