Published on
:
08 Feb 2025, 5:36 am
Updated on
:
08 Feb 2025, 5:36 am
तळा येथे प्लास्टिक खाल्लेल्या गायीवर डॉक्टरांकडून यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तिच्या पोटातून तब्बल १८ किलो प्लास्टिक काढून तिला जीवनदान देण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
तळा शहरातील पुसाटी येथे रा-हणाऱ्या मंदार पेंडसे यांच्या गायीने चरायला गेल्यावर बऱ्याचदा प्लॅस्टिकच्या पिशव्या खाल्ल्यामुळे तिचे पोट फुगलेले होते. गायीबाबत तिचे मालक मंदार पेंडसे यांना चिंता वाटू लागल्याने त्यांनी तळा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात विचारपूस करून डॉक्टरांच्या सल्याने गायीवर शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले.
त्यानुसार तळा पशुधन विकास अधिकारी डॉ. शिवाजी वाघ, सोनसडे पशुधन विकास अधिकारी डॉ. नितीन जाधव पंचायत समिती सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. रघुनाथ पवार, संदीप नागोठणेकर व नामदेव जाधव यांनी आपल्या अथक परिश्रमाने गायीवर रुमेनोटॉमी ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केली. या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून गायीच्या पोटातून तब्बल १८ किलो. प्लॅस्टिक व सोबतच तारेचे वेटोळे व दोऱ्या काढून सदर गायीला जीवनदान दिले. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे पशुधन अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वस्तरातन अभिनंदन करण्यात आले.