RG Kar Rape case| पीडितेच्या पालकांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकारfile photo
Published on
:
07 Feb 2025, 5:39 am
Updated on
:
07 Feb 2025, 5:39 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: RG Kar Rape case | कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि खून प्रकरणी मुख्य आरोपी संजय रॉय याला दोषी ठरवले. यानंतर सियालदह न्यायालयाने आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा नवी याचिका दाखल केली. त्यांच्या या याचिकेवर आज (दि.७) सुनावणी झाल्याचे वृत्त आहे.
RG Kar Medical College rape and murder victim's parents have filed a petition in the Supreme Court, seeking re-investigation.The CJI declined an urgent hearing and will schedule a future date for the case pic.twitter.com/gsDiPoPq9h
— IANS (@ians_india) February 7, 2025'ANI'ने दिलेल्या वृत्तानुसार, आरजी कर मेडिकल कॉलेज बलात्कार आणि खून पीडितेच्या पालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्यामध्ये पुन्हा चौकशीची मागणी करण्यात आली आहे. सरन्यायाधीशांनी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. या प्रकरणातील पुढील सुनावणी १७ मार्च रोजी होणार आहे, असे देखील न्यायालयाने म्हटले आहे.