Sachin Tendulkar Pune : प्रसिद्ध चितळे उद्योग समूहाला 75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने पुण्यात कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. टीम इंडियाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याचा या कार्यक्रमात खास सन्मान करण्यात आला.
Sachin Tendulkar Pune
टीम इंडियाचा माजी फलंदाज, मास्टर ब्लास्टर, भारतरत्न अशा अनेक विशेषणाने ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकर यांचा शनिवारी मुंबईत जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर आता अवघ्या काही तासांनी सचिनचा पुण्यात सन्मान करण्यात आला. भारतरत्न सचिन तेंडुलकर याने चितळे उद्योग समूहाच्या अमृत महोत्सवानिमित्त पुण्यात आयोजित कायक्रमाला उपस्थिती लावली. या दरम्यान सचिनला त्यांचं भलंमोठं स्केच भेट म्हणून देण्यात आलं.
पुण्यातील प्रसिद्ध चितळे उद्योग समूहाला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. चितळे उद्योग समूहाच्या अमृत महोत्सवाला उपस्थिती लावली. सचिन तेंडुलकर हे चितळे उद्योग समूहाचे ब्रँड अँम्बेसडर आहे. चितळे उद्योग समूहाची जगभरात बाकरवडी पोहोचवणारा समूह अशी ओळख आहे.