नुकतीच ऑटो-रिक्षा चालक भजन सिंहने सैफ अली खानची रुग्णालयात भेट घेतली.(Image source- Filmfare X account)
Published on
:
22 Jan 2025, 11:44 am
Updated on
:
22 Jan 2025, 11:44 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याला मंगळवारी (दि.२१) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. १६ जानेवारीच्या पहाटे सैफवर जीवघेणा चाकू हल्ला झाला होता. लीलावती रुग्णालयात त्याच्यावर पाच दिवस उपचार करण्यात आले. दरम्यान, सैफ याच्यावरील हल्ला प्रकरणी पोलिसांनी ठाण्यातील घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट भागातील कांदळवन परिसरात लपून बसलेल्या शरीफूल इस्लाम या हल्लेखोराला अटक केली.
दरम्यान, १६ जानेवारीच्या पहाटे ऑटो-रिक्षा चालक भजन सिंहने सैफला रुग्णालयापर्यंत पोहोचवले होते. नुकतीच भजनने सैफची रुग्णालयात भेट घेतली. सैफने भजनची त्याच्या आईशी (शर्मिला टागोर) ओळख करून दिली. यावेळी सैफ अली खानची आई शर्मिला टागोर यांनीही भजनचे आभार मानले आणि त्याला आशीर्वादही दिले.
'सैफने माझे आभार मानले, शर्मिला टागोरनी आशीर्वाद दिले'
सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबाला भेटल्यानंतर ऑटो-रिक्षा चालक भजन सिंह म्हणाला, "त्याने माझे आभार मानले. त्यांच्या आईने आणि संपूर्ण कुटुंबाने मी चांगले काम केल्याबद्दल माझे कौतुक केले. मला धन्यवाद दिले. मी त्यांच्या आईंना भेटलो आणि त्याचे आशीर्वाद घेतले. मला खूप आनंद झाला. कारण मला इतक्या मोठ्या अभिनेत्याला भेटता आले. त्या पहाटेच्यावेळी मी पैशाचा अथवा इतर कशाचाही विचार केला नाही. मला केवळ त्यांचा जीव वाचवायचा होता..." अशी भावना त्याने व्यक्त केली आहे.