वर्धा (Wardha) :- जिल्ह्यातील विरुळ नजीकच्या समृद्धी महामार्गावर बस प्रवाशी व ट्रक क्र CG 07 CP 4559 हा ट्रक इथे आज पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास मुंबई कॉरिडॉर (Mumbai Corridor) इथून जात असताना ट्रक ड्रायव्हर चे वाहनावरील नियंत्रण सुटले व ट्रक बैरींगेटिंग तोडून समोरून नागपुर कॉरिडॉर वरील येणाऱ्या बस क्र MP 44 ZE 7884 या वाहनावरील धकडले असता भीषण अपघात (Accident)झाला.
ट्रॅव्हल ट्रक चा भीषण अपघात
ट्रक क्र-: CG 07CP 4559 ड्रायव्हर लव शर्मा वय (28 ) हा किरकोळ जखमी असून क्लीनर रणजित विश्वकर्मा (रा.छतरपूर पुलाअ (Jharkhand)हा गंभीर जखमी आहे व ट्रॅव्हल बसक्र MP 44 ZE 7884 ड्रायव्हर रफिक खान (वय 35) हा गंभीर जखमी असून क्लीनर निसार खान (25) जोधपूर (Rajasthan) हे किरकोळ जखमी झाले आहे व काही प्रवाशांना मार लागल्याने त्यांना अंबुलन्सने (Ambulance)पुलगाव येथे नेण्यात आले तेथून त्यांना सावंगी रेफर करण्यात आले.
यावेळी घटनास्थळी धामणगाव, वर्धा, विरुळ येथून त्वरित अँबुलन्स व डॉक्टर ची टीम घटनास्थळी दाखल झाली नागपूर वरून मुंबईकडे लोखंडी अँगल घेऊन जात असतांना झोपेची डुलकी आल्याने ट्रक नागपूर कँरिडोर वरून मुंबई कँरिडोर वर येऊन ट्रॅव्हल ला धडक दिली या ट्रॅव्हल मधील प्रवासी
1) मनोहर भंडारे वय (62)
2) धनलक्ष्मी भंडारे (56)
3) श्रद्धा भंडारे (27)
4)विद्या केंडले (57)
5) श्रीनिवास केण्डले (68)
6)दर्शन पंडित (22)
7) महादेव अंबोले (46)
8) वेणू गोलीपिल्ली(40)
9) स्वप्नील जगताप (24)
10) राहुल गौर (24)
11) अजय श्रीवास्तव (36)
12) रवी गोलीपिल्ले (42)
13) विकास माडी (40)
14) गणेश रामनडी (35)
15) सुरेश इरावती (42)
16) अमित सरगर (24)
17)स्वामी पुल्ली (45)
18) प्रकाश वर्से (44)
19) गजानन बर्वे (42)
20) संतोष सखपाळ(48)
21) गणेश किर्ते (36)
22) शिवम मिश्रा (36)
23) महेश अंबोरे (38)
24) श्रीकांत उम्मुखे (38)
इत्यादी आहे. त्यांना पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. या घटनेची माहिती पुलगाव पोलिसांना मिळताच पुलगाव येथील पीएसआय सदानंद वढतकर,मोहम्मद गौरव, व पोलीस कर्मचारी घटनास्थळी त्वरित दाखल झाले तसेच समृद्धी महामार्ग (Samruddhi highway) पेट्रोलिंग चे पीएसआय प्रमोद धोटे, पो हवा.भारत पिसुड्डे, सुनील भगत, अजय बेले, निखिल वाडकर, घटनास्थळी दाखल झाले समृद्धी महामार्गावर अपघात झाल्याने वाहतुकीला अडचण येत असल्याने अँफकोन कंपनीतील सेप्टि डिपार्टमेंट अधिकाऱ्यांनी रस्ता सुरहित करून वाहतूक सुरहित केली पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहे.