अंजलीताई ‘बदनामियां’च्या बुद्धीची किव येते, आम्ही शांत बसलो याचा अर्थ… धनंजय मुंडे संतापले

2 hours ago 1

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचा तब्बल 800 कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा घोटाळा उघड केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याच्या आरोपानंतर आता धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप फेटाळले आहेत. माझं मीडियाला चॅलेंज आहे. अंजली बदानमियांनी.. बदनामी करण्यापलिकडे एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात देशात कुठे तरी टिकलाय का. सत्य झाला का? असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केला.

जी प्रक्रिया राबवली गेली ती पूर्व मान्यतेनेच राबवली गेली. त्यामध्ये विविध कंपन्यांकडून स्पर्धात्मक दर मागवले होते. त्यात जास्तीत जास्त कंपन्यांनी यात सहभागी व्हावे म्हणून निविदा प्रक्रियेला दोनदा मुदत वाढ दिली. कोणी दोन वेळा मुदत वाढ देईल का.

नॅनो युरीया किंवा नॅनो डीएपीचे दर संबंध देशात समान आहे. त्यामुळे यात तफावत आहे, अमूक कोटीचा भ्रष्टाचार झाला हे म्हणणं म्हणजे जनतेला फसवणं आहे. धादांत खोटं बोलणं, त्यातून सनसनाटी निर्माण करणं. अंजलीताई आरोप करायच्या. त्यावर विश्वास राहायचा. आता तो राहिला नाही.

अधिक टिकाऊ आणि सहा महिन्याऐवजी १ वर्षाची गॅरंटी देणारा, त्यातही इतर राज्यांपेक्षा २८५७ रुपयात हा पंप शासनाला पडला आहे. या पंप खरेदीत ज्या ज्या शेतकऱ्यांना पंप मिळाले त्यांनी आमचे आभार मानले आहेत.

कापूस साठवणूक बॅगेच्या खरेदीवर त्या बोलल्या. याची किंमत कुणी करावी हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी राज्यात कापसाला भाव नव्हते. शेतकऱ्यांच्या घरात होता. कापसावर अनेकवेळा फवारणी केली त्यामुळे घरातील लोकांच्या त्वचेवर परिणाम झाला. त्यामुळे कापूस बॅगा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. सिरकॉट इंडिया ही केंद्राची कंपनी आहे. त्यांनी किंमत ठरवून दिली. जी किंमत ठरवून दिली, त्यापेक्षा कमी किंमतीत बॅगा खरेदी केल्या आहेत. आता प्रत्येक गोष्टीत खरेदीची किंमत काय दमानियांना विचारून सरकारने खरेदी करायची. त्यावेळी उचित आणि बाकी उचित नाही. त्यांना विचारून दर देईल, ते योग्य आणि नाही दिला तर भ्रष्टाचार असं समजायचं. आजवर अनेक आरोप माझ्यावर झाले. आज ५८ वा दिवस आहे. मी आणि मी. दमानियाने बीडला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. बहुजन समाजाला बदनाम करण्याचे प्रयत्न केले. एवढेच नाही तर त्यांच्या बुद्धीची किव करावी का. त्या हुशार आहे. मला आदर आहे. जे आरोपी पकडायचे आहेत त्यांचा खून झाला म्हणाला. हा त्यांचा खोटारडेपणा बाहेर नाही आला. माझं मीडियाला चॅलेंज आहे. अंजली बदानमियांनी.. बदनामी करण्यापलिकडे एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात देशात कुठे तरी टिकलाय का. सत्य झाला का?

त्यांना परत राजकारणात यायचं असेल त्यामुळे न्यूज व्हॅल्यू वाढवण्याचा विषय असतो. त्यामुळे खोटे आरोप करू नका. ऑफिस ऑफ प्रॉफिटचा विषय काढला. थर्मल पॉवरने जी घाण केली आहे. ती घाण थर्मल पॉवरने पैसा देऊन काढावी, अशी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे. याबाबत त्यात शासकीय पद आहे, माझ्या कंपनीत. माझ्या बायकोला बसवलं की मी बसवलं. ती २००६ची कंपनी आहे. त्या राखेमुळे सिमेंट इंडस्ट्री आलीय, रोजगार आलाय. ज्यावेळेस राख बॅगमध्ये जात नव्हत्या. तेव्हा राखेचे तळं असायचे. आमच्याकडे दोन चार तळे आहेत. ते साफ करायला नको. मे महिन्यात आल्यावर आमची परळी धुळीत दिसते. राखेत दिसतो. यावरही आरोप करायचे. ऊर्जा विभागाने म्हणावं ही राख घेऊन जाणं बेकायदेशीर आहे. याचा अर्थ आम्ही शांत बसलो असं कुणी समजू नका. आम्हाला बोलता येत नाही. आमच्याकडे काहीच नाही. मीडियात यायचं स्वत:चा प्रभाव निर्माण करणं अवघड नाही. पाच वर्ष विरोधी पक्ष होतो. बीडमध्ये भयंकर घटना घडली आहे. ही संवेदनशील घटना आहे. हत्यारांना फासावर लटकवणं जबाबदारी आहे. यातून वादावर वाद नको म्हणून गप्प बसतो. एक विषय झाला तर दुसरा विषय. काय करायचयं? माझी अंजली ताई बदनामीया यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचा काम ज्याने कुणी दिलं असेल त्यांना अंजली दमानियांना माझ्याकडून शुभेच्छा आहे. साप म्हणून भूई थोपाटणं, मीडियातून सनसनाटी निर्माण करणं आणि एखाद्याचं राजकीय आणि सामाजिक आयुष्य संपवणं एवढं सोपं नसतं.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article