1911 मध्ये ऑस्ट्रेलियन भूगर्भशास्त्रज्ञ थॉमस ग्रिफिथ टेलर यांना टेलर ग्लेशियरचे अन्वेषण करीत असताना काहीतरी असामान्य असे समजले. त्यांना एक असा धबधबा सापडला, जो बर्फाळ, सफेद पार्श्वभूमीवर ठळकपणे दिसत होता. लालभडक रंगाचा हा धबधबा पाहून ते थक्कच झाले. सुरुवातीच्या संशोधनांमधून असा कयास करण्यात आला होता की, लाल शैवालामुळे या धबधब्याला असा रंग मिळाला असेल. मात्र, 2003 मध्ये अलास्का विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधनातून असे दिसून आले की, हा पाण्याचा लाल रंग लोहयुक्त पाण्यापासून येतो, जे हिमनदीखाली लाखो वर्षांपासून अस्तित्वात आहे. ज्यावेळी हे पाणी पृष्ठभागावर येते आणि त्याचा ऑक्सिजनशी संपर्क येतो, त्यावेळी ते ऑक्सिडेशनच्या प्रक्रियेतून जाते. याच प्रक्रियेमुळे लोखंडाला गंज चढत असतो. या प्रक्रियेमुळे धबधब्याला असा लालभडक रंग मिळतो. या पाण्यात सूर्यप्रकाश, ऑक्सिजन नसले तरी ‘केमोसिंथेसिस’ नावाच्या प्रक्रियेने जीवाणूंंची वस्ती अस्तित्वात असते. अत्यंत थंड परिस्थितीतही तिथे असा धबधबा वाहतो हे विशेष! याठिकाणी अनेक वेळा तापमान उणे 19 अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. मात्र, तरीही हा धबधबा कसा वाहतो याचेही कुतुहल होते. 2003 मध्ये त्याचे उत्तर सापडले. समुद्राच्या पाण्यापेक्षा सुमारे दुप्पट क्षार किंवा मीठ असलेले हे पाणी आहे, तसेच त्याला हिमनदी गोठण्याच्या प्रक्रियेतून मिळणारी उष्णताही मिळते. यामुळे हा धबधबा वाहता राहतो.
अंटार्क्टिकामध्ये कोसळतो ‘रक्ताचा धबधबा’!
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- अंटार्क्टिकामध्ये कोसळतो ‘रक्ताचा धबधबा’!
Related
आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? | शन...
2 minutes ago
0
आम्ही शासनाकडून निधी आणतो,अधिकारी झोपा काढतात- मंत्री:डीपीस...
3 minutes ago
0
Budget आधी गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये कपात, जाणून घ्या किती झ...
5 minutes ago
0
डॉ. आंबेडकरांनी पत्रकारितेतून स्वाभिमान जागवला- प्रा. मेश्रा...
5 minutes ago
0
‘त्या’ महिलांना दिला मतदानाचा हक्क; संस्थेचा जिल्हा प्रशासना...
6 minutes ago
0
जि. प. अधिकारी, कर्मचाऱ्यांची धमाल; रंगतदार कलाविष्कारांनी व...
7 minutes ago
0
पूर संरक्षक भिंतीच्या कामात घोळ:गोंडवाघोलीच्या महिलांचा आरोप...
8 minutes ago
0
अमेरिकेत पुन्हा विमान दुर्घटना, उड्डाणानंतर 30 सेकंदातच कोसळ...
8 minutes ago
0
IND vs ENG : “एका ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावणं..”, सूर्यकुमार...
8 minutes ago
0
"एचव्हीपीएम'च्या कुस्तीपटूंनी जिंकली विविध 11 पदके:तीन सुवर्...
8 minutes ago
0
LPG price | अर्थसंकल्पाच्या दिवशी पहिली आनंदाची बातमी; एलपीज...
11 minutes ago
0
इथेनॉल दरवाढीने शुगर लॉबीस ‘बूस्टर’
28 minutes ago
0
Top NewsPaperMore Newspapers
Popular
Tesco's new 'boujee' F&F women's range with epic Zara dupes
6 days ago
113
© Rss Finder Online 2025. All Rights Reserved. | Designed by MyHostiT