Published on
:
06 Feb 2025, 12:45 am
Updated on
:
06 Feb 2025, 12:45 am
कणकवली ः महामार्गावर असलदे ते तावडेवाडी जाण्यासाठी गोवा ते मुंबई लेनवर वळत असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने मोटरसायकल स्वार सुरेंद्र विष्णू गगनग्रास (60,रा. नांदगाव -मधलीवाडी) हे आणि त्यांच्या पाठीमागे मोटरसायकलवर बसलेले गोविंद दिल्लीसिंग मुखिया (60, मु.रा.भांडुप मुंबई) हे गंभीररित्या जखमी झाले.तर उपचारासाठी गोवा बांबुळी रुग्णालयात दाखल केलेले गोविंद मुखिया यांचा बुधवारी पहाटे 2.30 च्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ते गुरखा म्हणून काम करत होते.
हा अपघात मंगळवारी सायंकाळी 6.30 वा. च्या सुमारास महामार्गावर असलदे येथे सुनिल दळवी यांच्या घरासमोर झाला होता. याबाबची खबर गुरुप्रसाद उर्फ पंढरी वायंगणकर (रा. असलदे) यांनी कणकवली पोलिसांत दिली. मोटरसायकल स्वार सुरेंद्र हे असलदे तावडेवाडी येथे जात असताना वाटेत गोविंद मुखिया यांनी त्यांना थांबवल्यानंतर त्यांच्या मोटरसायकलवर बसले. त्यानंतर पुढे काही अंतरावर गोवा-मुंबई लेनवर जात असताना दळवी यांच्या घरासमोर हा अपघात झाला.त्यात दोघेही गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्या मोटरसायकलला धडक देणारे पसार झाले.याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.