कारखाली चिरडून बालकाचा मृत्यूFile photo
Published on
:
06 Feb 2025, 3:51 am
Updated on
:
06 Feb 2025, 3:51 am
नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावरील हाॅटेल एक्स्प्रेस इनच्या पार्किंग मध्ये खेळत असलेल्या साडेचार वर्षीय बालकाचा कारखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी घडली. ध्रुव अजित राजपूत (रा. उपेंद्र नगर सिडको) असे चिमुकल्याचे नाव आहे.
इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ध्रुव हा त्याचे वडील अजित राजपूत यांच्यासह हॉटेल एक्स्प्रेस इन येथे ग्राहकांना कारमधून सोडवण्यासाठी आला होता. वडील फोनवर बोलत असताना ध्रुव हा कारमधून खाली उतरला व खेळत होता. त्याचवेळी कार (एमएच 15 एफएन 2949) गेटमधून आत आली. कार चालकाला ध्रुवचा अंदाज न आल्याने तो कारखाली चिरडला गेला. अपघातानंतर कारचालक फरार झाला तर ध्रुवच्या वडिलांनी त्यास रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर मार लागल्याने ध्रुवचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.