साक्री तालुक्यातील लोणखेडी ते बळसाणे रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य वाढले आहे. Pudhari
Published on
:
06 Feb 2025, 6:43 am
Updated on
:
06 Feb 2025, 6:43 am
पिंपळनेर, जि.धुळे
साक्री तालुक्यातील लोणखेडी ते बळसाणे रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य वाढले आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेने ग्रामस्थ खडतर प्रवास करताय अन् विमलनाथाच्या दर्शनाला खड्यांचे अडथळे ठरत आहे. दुसरीकडे वाहनचालकांचे कंबरडे मोडले जात आहे.
मुंबई, नाशिक व ठाणे,बोरिवली,कल्याण, कोल्हापूर,सातारा,इगतपुरी,घोटी,पनवेल आदी ठिकाण्याहून भाविक धुळे मार्गाने कमी अंतरावरून बळसाणे तीर्थ गाठतात. या रस्त्याचे अंतर साधारणतः13 ते 14 किलोमीटर असून रस्त्याची अंत्यत वाईट अवस्था झाली आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न वाहनचालाकंना पडत आहे. या रस्त्यावरून जाताना अक्षरशा नागरिकांचे कंबरडे मोडले जात आहे. ऐवढी दुरवस्था या रस्त्याची झाली आहे. तर बळसाणे येथील तीर्थक्षेत्रावर येणाऱ्या भाविकांनीही हा खडतर प्रवास करावा लागत असल्याने संबंधित यंत्रणेला सदबुद्धी देवो,अशी प्रार्थना ते या तिर्थक्षेत्राचे दर्शन घेतल्यानंतर भक्तगण निश्चितच करीत असतील असा अंदाज भाकीत होत असेल.
गेल्या अनेक वर्षांपासून लोणखेडी ते बळसाणे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. दरम्यान धुळे येथून बळसाणे जाण्यासाठी कढरे मार्गाने अंतर कमी असल्याने भाविक व वाहन चालक या रस्त्याला पसंती दर्शवीत आहे.रस्ता पुर्णपणे डांबरीकरण झाल्यास प्रवाशी व पर्यटक सहज पणे बळसाणे तीर्थक्षेत्र गाठतील असा अंदाज वर्तविला जात आहे पण लोणखेडी ते बळसाणे गावा पर्यंत रस्ता डांबरीकरण झाला की बळसाणेसह परिसरातील अनेक शासकीय,शालेय, रुग्णालय काम कमी वेळात होतील व खर्चाची बचत होईल आणि महामंडळाची बसेस देखील या मार्गावरून ये जा करतील सहज महामंडळाच्या तिजोरीत वाढ होईल लोणखेडी ते बळसाणे हा रस्ता 13 किलोमीटरच्या अंतराचा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे.अक्षरशः डांबर उखडून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे असं बयाव दृश्य बघावयास मिळत आहे.या रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनचालाकांना मोठी कसरत करावी लागते,कोणता खड्डा टाळू असा प्रश्न या वाहनाचालकांना पडतो.त्यामुळे खड्डा चुकवताना समोरून येणाऱ्या वाहनावर काही वाहने ही धडक देतात.त्यामुळे किरकोळ अपघात होऊन वाहनचालाकंमध्येच वाद निर्माण होताना दिसून येत आहे. तरीही या समस्येकडे संबंधित यंत्रणा ढुंकूणही पाहण्यास तयार नाही. विशेष म्हणजे बळसाणे येथे जैन धर्मियांचे मोठे तिर्थक्षेत्र आहे. त्यामुळे या तिर्थक्षेत्राचे दर्शन घेण्यासाठी रोज शेकडो भाविक आणि नागरिक या रस्त्यावरून ये-जा करीत असतात.त्यामुळे नेहमी वर्दळीचा रस्ता असल्याने नागरिकांना नाहक निर्ढावलेल्या यंत्रणेच्या कामचुकारपणामुळे या रस्त्याची समस्या झेलावी लागत आहे. या रस्त्याचा कोणीही वाली नाही का,असा प्रश्न बळसाणे येथील गिरीश जैन व कढरे डॉ.साईदास चव्हाण,कैलास चव्हाण यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे तातडीने या रस्त्याकडे संबंधित यंत्रणेने त्वरीत लक्ष देऊन समस्या सोडावी, अशी मागणी भाविक आणि ग्रामस्थांकडून होत आहे.
लोणखेडी ते बळसाणे हा 13 किलोमीटर बळसाणे पर्यंतचा रस्ता.पूर्णतःउखडला गेल्याने हा रस्ता लोणखडी कढरे मार्गाने बळसाणे गावाचे अंतर अत्यंत कमी असून वाहनचालकांसह भाविक याच रस्त्याने पसंती दर्शवितात.या रस्त्याचे पूर्णता डांबरीकरण झाल्यास भाविकांची गैरसोय दूर होईल अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते गिरीश जैन व डॉ.साईदास चव्हाण,कैलास चव्हाण यांनी केली आहे.