Kolhapur News | शिवनाकवाडी विषबाधा प्रकरण : बाधित रुग्णांची संख्या वाढली, प्रशासन सतर्कfile photo
Published on
:
06 Feb 2025, 6:29 am
Updated on
:
06 Feb 2025, 6:29 am
कुरुंदवाड : Kolhapur News | शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे विषबाधेचे प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासन तातडीने ॲक्शन मोडवर आले आहे. कर्नाटकच्या सीमेलगत असलेल्या मानकापूर आणि शिरदवाड गावतील बाधित रुग्ण मिळून आले आहेत. दोन्ही गावातील रुग्णांची संख्या 140 हून अधिक झाली आहे. 20 लोकांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना आय.जि.एम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. विषबाधेचे प्रमाण वाढल्याने आजूबाजूच्या गावांमध्येही घबराटीचे वातावरण पसरले आहे.
शिरदवाड गावातही विषबाधेचा परिणाम दिसून आल्याने आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरू केले आहे. घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जात असून ज्या व्यक्तींमध्ये लक्षणे दिसत आहेत, त्यांना त्वरित वैद्यकीय मदत दिली जात आहे. 97 रुग्णांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. आज सकाळपासून आणखी 20 जणांना अधिक त्रास जाणवू लागल्याने त्यांना आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे बाधितांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. रुग्णालय प्रशासनही सतर्क झाले असून डॉक्टर व परिचारिका रात्रंदिवस सेवा देत आहेत. विषबाधा प्रकरणामुळे संपूर्ण भागात भीतीचे वातावरण आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असून नागरिकांना योग्य उपचार दिले जात आहेत.