geralad coetzee ind vs saImage Credit source: Richard Huggard - Gallo Images/Getty Images
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन 2017 नंतर यंदा करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी सहभागी संघ या स्पर्धेच्या दृष्टीकोनातून सराव व्हावा या उद्देशाने एकदिवसीय मालिका होत आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील वनडे सीरिजचा थरार 6 फेब्रुवारीपासून रंगणार आहे. तर दुसऱ्या बाजूला 8 फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात त्रिसदस्यीय एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका लागला आहे.
दक्षिण आफ्रिका या त्रिसदस्यीय एकदिवसीय मालिकेतील मोहिमेची सुरुवात 10 फेब्रुवारीपासून करणार आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर या सामन्यात न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यासाठी 12 सदस्यीय संघ जाहीर केला. मात्र संघ जाहीर केल्यानंतर 4 तासांमध्येच मोठा झटका लागला आहे. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू दुखापतीमुळे वनडे सीरिजसह आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसाठी हा मोठा झटका समजला जात आहे.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी याला दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेसह चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकावं लागलं आहे. दक्षिण आफ्रिकेकडून अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. गेराल्डला बुधवारी बॉलिंग करताना कंबरेत त्रास जाणवला. त्यामुळे गेराल्डला बाहेर पडावं लागलं.
दरम्यान गेराल्ड हा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर पडणारा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा खेळाडू ठरला आहे. गेराल्ड आधी एनरिक नॉर्खिया यालाही दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.
गेराल्ड कोएत्झी ‘आऊट’
PLAYER UPDATE 🗞
Proteas accelerated bowler Gerald Coetzee has been ruled retired of the upcoming tri-nation One-Day International (ODI) bid against Pakistan and New Zealand.
The 24-year-old experienced tightness successful his groin portion completing his 10 overs astatine grooming connected Wednesday… pic.twitter.com/3vr175kK4z
— Proteas Men (@ProteasMenCSA) February 5, 2025
त्रिपक्षीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ : टेम्बा बावुमा (कॅप्टनन), ईथन बॉश, मॅथ्यू ब्रीट्जके, जूनियर डाला, वियान मुल्डर, मिहलाली मपोंगवाना, सेनुरन मुथुसामी, गिदोन पीटर्स, मीका-ईल प्रिंस, जेसन स्मिथ आणि काइल वेरिन.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी दक्षिण आफ्रिका टीम : टेम्बा बावुमा (कॅप्टन), टोनी डी जॉर्जी, मार्को यान्सेन, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्करम, डेव्हीड मिलर, वियान मुल्डर, लुंगी एन्गिडी, कगिसो रबाडा, रियान रिकेल्टन, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स आणि रॅसी वॅन डर डुसेन.