मार्कस स्टाइनिसची वनडे क्रिकेटमधून निवृत्ती!Australia Cricket
Published on
:
06 Feb 2025, 6:55 am
Updated on
:
06 Feb 2025, 6:55 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिसने त्याच्या एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा तात्काळ निर्णय घेतला. त्याने टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार असल्याने हा निर्णय घेण्याचे सांगितले आहे. स्टॉइनिसने २०१५ मध्ये पदार्पण केल्यापासून ७१ सामन्यांमध्ये खेळला आहे. स्टॉइनिसला यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात स्थान देण्यात आले होते. मात्र आता त्याच्या जागा दुसऱ्या खेळाडूला संधी मिळणार असल्याची माहिती 'क्रिकबज'ने दिले आहे.