छत्रपती संभाजीनगरला हादवणाऱ्या अपहरण प्रकरणाचा शेवट गोड झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. 2 कोटींच्या खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी शिताफिने सूत्र फिरवत या चिमुकल्याची एका शेतातून सुटका केली. यामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आला होता. पण बिहारमधील एका व्यक्तीच्या संपर्कात येऊन तो अपहरणाच्या कटात सहभागी झाल्याचे समोर आले आहे. या अपहरण प्रकरणाचे अनेक पदर अजून समोर यायचे आहेत.
मंगळवारी घरा शेजारून केले अपहरण
बिल्डर सुनील तुपे यांचा मुलगा चैतन्य तुपे याचे मंगळवारी रात्री 8.45 वाजता अपहरण करण्यात आले होते. सिडको भागातून त्याचे अपहरण करण्यात आले होते. ही बाब समोर येताच एकच खळबळ उडाली होती. चैतन्यच्या शोधासाठी पोलिसांनी 0 पथक तयार पथक तयार केली होती. एका आरोपीकडे बंदूक असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी सावधतेने तपास सुरू केला होता.
हे सुद्धा वाचा
दारू ढोसली नि अपघात
सुनील तुपे रात्री जेवण झाल्यावर घरासमोर फेरफटाका मारत होते. तर चैतन्य हा सायकलवर खेळत होता. त्याचवेळी चारचाकीतून येत आरोपींनी त्याचे अपहरण केले. तर निनावी मोबाईलवरून फोन करत दोन कोटींची खंडणी मागितली होती. अपहरकर्ते छत्रपती संभाजीनगर शहरातून फुलंब्री, पालफाट्याकडून तळेगावकडे पळाले. त्यावेळी त्यांनी दारू ढोसली. हसनाबादकडून जाफ्राबादकडे जाताना रात्री 1 वाजता त्यांनी मालवाहू गाडीला आसई पाटीजवळ धडक दिली. एअरबॅग उघडल्याने दोघांना किरकोळ दुखापत झाली. पण गावकऱ्यांनी धाव घेतल्याने आरोपी कार सोडून पळाले. त्यातील एकाला गावकऱ्यांनी पकडले आणि हळूहळू अपहरण नाट्यातील आरोपी पोलिसांच्या हाती आले. रुग्णालयात भरती आरोपी प्रणव शेवत्रे याच्याकडून अपहरण प्रकरण समोर आले.
मक्याच्या शेतातून केली सूटका
पोलिसांनी नंतर तपासचक्रे फिरवली. अपघातानंतर आरोपी हर्षल शेवत्रे हा चैतन्यला घेऊन गावाशेजारील एका मक्याच्या शेतात लपल्याचे समोर आले. पथकाने शेतात धाव घेतली. हर्षलवर झडप घातली आणि चैतन्यची सुटका केली. प्रकरणात कृष्णा पठाडे याच्यासह शिवराज गायकवाड, जीवन शेवत्रे, हर्षल शेवत्रे, प्रणव शेवत्रे यांना जेरबंद करण्यात आले.
स्पर्धा परीक्षेऐवेजी केले अपहरण
कृष्णा पठाडे हा आरोपी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी शहरात आला होता. पण अधिकारी होण्याऐवजी तो आरोपी झाला. अपहरण प्रकरणात त्याला पोलिसांनी अटक केली. एका बिहारमधील व्यक्तीच्या मदतीने आरोपींनी अपहरण कांड केल्याची माहिती समोर येत आहे. झटपट श्रीमंतीचा हा शॉर्टकट त्यांना तुरुंगात घेऊन गेला.