अशोक मोहितेला मारहाण करणारे संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेल्या कृष्णा आंधळेच मित्र असल्याचं बोललं जातय. कृष्णा आंधळे याचा वाढदिवस होता. म्हणून त्याच्या मित्रांनी व्हॉट्सअॅपला कृष्णा आंधळेचा फोटो स्टेटसला ठेवला होता.
वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्या म्हणून धारूरच्या एका तरूणाला जबर मारहाण करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. तरूणाला मारहाण करणारे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे यांचे मित्र असल्याची माहिती मिळतेय. मारहाण करण्यात आलेल्या तरूणाचे नाव अशोक मोहिते आहे. वैजनाथ बांगर आणि अभिषेख सानप या व्यक्तींकडून अशोक मोहितेला मारहाण करण्यात आली. वैजनाथ बांगर आणि अभिषेख सानप यांच्या इन्स्टाग्राम स्टेटसवर कृष्णा आंधळेचा फोटो आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या वाढदिवसानिमित्त स्टेटस ठेवले असल्याचे समोर आले आहे. वाल्मिक कराडचे व्हिडिओ पाहत असलेला अशोक मोहिते हा तरुण त्यांच्या नजरेस पडला. वाल्मिक कराड याचे व्हिडीओ का पाहातो अशी विचारणा करत अशोक मोहितेला मारहाण आणि कोयत्याने वार करण्यात आले. इतंकच नाहीतर तुझा संतोष देशमुख करू, अशी धमकीही अशोक मोहितेला यावेळी मारहाण करणाऱ्यांनी दिली. दरम्यान, अशोक मोहिते हा सामान्य कुटुंबातील असून धारुरच्या पोलीस स्टेशनमध्ये तो होमगार्डमध्ये म्हणून नोकरी करतो. मापहाणीनंतर अशोकच्या डोक्याला मार लागला असून त्याच्या डोळ्यावर सूज आहे. पाठीवरही मुकामार आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
Published on: Feb 06, 2025 12:27 PM