तर, या वर्षात दाखल झालेल्या 10 गुन्ह्यांमध्ये 7 गुन्हे उघडकीस आले असून, त्यामध्ये 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्वांत जास्त 28 तोडफोडीच्या घटना परिमंडल-5 मध्ये झाल्या आहेत. त्यामध्ये कोंढवा, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, हडपसर, वानवडी, लोणी काळभोर, काळेपडळ, फुरसुंगी, मुंढवा अशा पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ परिमंडल-4 मध्ये 23 तोडफोडीच्या घटना दाखल झाल्या आहेत.
त्यामध्ये मुख्यत्वे करून चतुःशृंगी, बाणेर, येरवडा, चंदननगर, विमाननगर, खडकी, लोणीकंद, खराडी, वाघोली अशा पोलिस ठाण्यांचा सहभाग आहे. त्याखालोखाल परिमंडल-3 मध्ये 17 तोडफोडीचे गुन्हे दाखल झाले. यामध्ये कोथरूड, वारजे माळवाडी, डेक्कन, पर्वती, सिंहगड रोड, नांदेड सिटी, यांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ परिमंडल-2 मध्ये 11 तोडफोडीच्या घटनांची, तर परिमंडल-1 मध्ये 4 घटनांची मागील वर्षी नोंद झाली आहे.
25 टक्क्यांहून अधिक अल्पवयीन मुलांचा सहभाग
मागील वर्षी दाखल झालेल्या 83 गुन्ह्यांमध्ये 156 सज्ञान आरोपींचा सहभाग होता, तर या 83 गुन्ह्यांत सज्ञान आरोपींव्यतिरिक्त 52 अल्पवयीन आरोपींचा (विधिसंघर्षित बालकांचा) सहभाग आढळून आला आहे. अल्पवयीन मुलांचा सहभाग तोडफोडीच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये 25 टक्क्यांहून अधिक असल्याचे यानिमित्तही अधोरेखित झाले आहे. तसेच अल्पवयीन बालकांना अशा गुन्हेगारीपासून परावृत्त करणे हा देखील मोठा टास्क सर्वांसमोर निर्माण झाला आहे.