बीड जिल्ह्यातील राजकारणात बाहुबली, कटप्पा, शिवगामी, बल्लालदेव कोण हे पाहावं लागेल असं सूचक वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले. बीडमधील आष्टीतील एका कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांनी आपण शिवगामीच्या भूमिकेत असल्याचे तर देवेंद्र फडणवीस हे बाहुबली असल्याचे वक्तव्य केले होते. गेल्या दोन दिवसांपासून खून, घोटाळ्याने बीड जिल्हा राज्याच्याच नाही तर देशाच्या नकाशावर आला आहे. त्यातच आता दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोपांची मालिका सुरू झाल्यानंतर राजकारणात आता नवीन वादळं तर येणार नाही ना? अशी चर्चा रंगली आहे.
धनंजय मुंडेंवर पु्न्हा डागली तोफ
धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना पावणे तीनशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. हे आरोप मुंडे यांनी फेटाळले. त्या बदनामिया असल्याचा आरोप केला. त्यानंतर आज अंजली दमानिया यांनी त्यांच्या आरोपांना, दाव्यांना पुष्टी देण्यासाठी थेट त्या उत्पादनाची ऑनलाईन खरेदीची करून दाखवली आणि मुंडे कसे खोटे बोलत आहेत, ते मांडण्याचा प्रयत्न केला.
हे सुद्धा वाचा
ब्रँड स्प्रे, आणि इफकोचा नॅनो युरियाचे काही प्रोडक्ट विकच घेतले , १८४ रुपये लिटर पडले, सरकारने ह्या बाटल्या २२० रुपयाने विकत घेतल्या, असे त्यांनी या खरेदीतून दाखवले. शेतकर्यांचे पैसे खाल्ले, वाल्मिक कराडला मोठं केलं, संतोष देशमुख यांचा जीव गेला, असे अर्थकारण, सत्ताकारण आणि राजकारणाचे पदर त्यांनी उलगडले.
ही तर दहशत माजवण्याचा प्रकार
वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्या म्हणून अशोक मोहिते नावाच्या तरूणाला मारहाण झाली हे संतापजनक आहे, हेच वाढदिवसाचे स्टेटस ठेवत आहेत, हे साफ चुकीचं आहे. ही दहशत माजवण्याचा प्रकार आहे, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला.
अशोक मोहितेला मारहाण करणारे तरुण आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र आहेत. वैजनाथ बांगर, अभिषेक सानपच्या स्टेटसवर आंधळेचा फोटो ठेवला. दोन्ही तरुणांनी कृष्णा आंधळेच्या वाढदिवसानिमित्त स्टेटस ठेवलेलं आहेत हा प्रकार संतापजनक आहे. आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप दमानिया यांनी केला.
धनंजय मुंडेवर कारवाई का नाही?
धनंजय मुंडेंनी कोणतीच कारवाई नाही का तर ते राज्यातील दोन मोठ्या नेत्यांचे जवळचे मित्र आहेत, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. मनोज जरांगे हे पण याबाबत बोलत आहेत ही मोठी गोष्ट आहे. विष्णू चाटेनी बड्या नेत्याला फोन केल्याचा, संशय आहे हे आधीच सांगितलं आहे. विष्णू चाटेने धनंजय मुंडेंना फोन केला का? हा महत्वाचा विषय आहे, असे दमानिया म्हणाल्या.
दमानियांचे मोठे संकेत
बीडचा कटप्पा कोण ? हे पाहावं लागेल, शिवगामी कोण? बल्लालदेव कोण असे सगळे प्रकार संतापजनक आहे.बीडमध्ये जे राजकारण सुरू आहे ते चुकीचं आहे. राजकारणी एकमेकांना मदत करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातील राजकारणात बाहुबली, कटप्पा, शिवगामी, बल्लालदेव कोण हे पाहावं लागेल असं सूचक वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले. त्यामुळे राजकारणात आता नवीन वादळं तर येणार नाही ना? अशी चर्चा रंगली आहे.