अनिल देशमुखांवरील हल्ला अस्वस्थ करणारा:माहितीशिवाय विनोद तावडेंवर बोलणं योग्य नाही- शरद पवार, योग्य उमेदवाराला मतदान करा
4 days ago
2
गेली अनेक वर्षे मी विनोद तावडे यांना ओळखतो. कालच्या प्रकरणी माहितीशिवाय विनोद तावडे यांच्यावर बोलणे योग्य नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तर महाराष्ट्रात नक्कीच सत्ता परिवर्तन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार म्हणाले की, प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाचा टक्का न वाढणे हे अशोभनीय आहे. तुम्हाला जो राजकीय पक्ष, व्यक्ती योग वाटत असेल त्याला मतदान करा, पण मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, असे पवारांनी म्हटले आहे. शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात साधारण मतदान हे शांततेत होत असते. पण माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जो हल्ला झाला तो अस्वस्थ करणारा आहे. पुन्हा अशा घटना होऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे. शरद पवार म्हणाले की, जी व्यक्ती एक वर्ष जेलमध्ये होती त्यांनी केलेल्या वक्तव्याची नोंद तरी का घ्यावी. त्यांची नोंद घेण्याची गरज नाही. कारण ज्यांच्याबद्दल माझ्याकडे विश्वासार्ह माहिती नाही, त्यामुळे मी विनोद तावडे यांच्यामुद्द्यावर काही बोलू शकत नाही. अजितदादांवर अन्याय झाला नाही शरद पवार म्हणाले की, अजित पवार यांनी 170 नाही तर 270 जागा सांगायला पाहिजे असे म्हणत अजित पवारांच्या वक्तव्यावर टीका केली. युगेंद्र पवार हे नवीन उमेदवार आहे. अजित पवार यांच्यावर काय अन्याय झाला, त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची खूर्ची आहे. सत्ता त्यांच्याकडे आहे. त्यांनी चौथ्यांदा उपमुख्यमंत्रीपद मिळाले. सुप्रिया सुळेंना जनतेने 4 वेळा संसदेत पाठवले यांचेच समाधान आहे असे त्यांनी यावेहभ् बोलताना म्हटले आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)