अन्नछत्रच्या पालखी परिक्रमेस प्रारंभ, महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांतून फिरणार:सात महिन्याचा प्रवास, 10 हजार किमी अंतर कापणार
6 hours ago
1
अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय..श्री अन्नपूर्णामाता की जय.च्या जय घोषातश्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या “पालखी परिक्रमेस गुरुवारी अक्कलकोट येथून प्रारंभ झाला. सुमारे २१७ दिवस चालणारी परिक्रमा १० हजार कि.मी.चा प्रवास करत महाराष्ट्रातील ३५ जिल्हे व ७५ तालुक्यातून ५०० गावांना भेट देत कर्नाटक राज्यातील बेळगाव गोवा राज्यातील २ जिल्ह्यातून जाणार आहे. पालखी परिक्रमा ७ महिने प्रवास करुन २६ जून २०२५ रोजी तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत विसावणार आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २७ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा काढण्यात येत आहे, यंदाचे २८ वे वर्ष असून, दरम्यान या परिक्रमेचा शुभारंभ श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे पुरोहित मंदार मोहनराव पुजारी, समाधी मठाचे धनंजय पुजारी, प्रसाद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री स्वामी समर्थ पदुकाच्या पूजनाने करण्यात आला. दरम्यान न्यासाच्या महानैवद्या बरोबर अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांनी श्रींचे पादुकासह श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात महानैवद्य पूजा संपन्न झाली.या प्रसंगी श्री वटवृक्ष देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे हे उपस्थित होते. अन्नछत्र मंडळातून निघालेल्या पालखीचे बुधवार पेठेतील समाधी मठ येथे आरती झाली. पुढे श्री खंडोबा मंदिरातील आरतीनंतर पालखी मार्गस्थ सोलापूरकडे झाली. दिनांक २१ नोव्हेंबर रोजी मंगळवेढा तालुक्यातील सोहाळे येथे मुक्काम असणार असून दिनांक २३ नोव्हेंबर रोजी पालखी सांगली जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या पालखी प्रस्थानवेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, खजिनदार लाला राठोड, विश्वस्त भाऊ कापसे, लक्ष्मण पाटील यांच्यासह भक्तगण सेवेकरी, वारकरी, कर्मचारी आदीजण उपस्थित होते. राज्यातील भक्तांना पादुका दर्शनाच्या लाभासाठी परिक्रमा न्यासाच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी-पादुकांचे दर्शन व सेवा संबंध महाराष्ट्रातील गावोगाव असलेल्या स्वामी भक्तांना करता यावे यासाठी श्री स्वामींच्या पालखी परीक्रमेचे आयोजन केले आहे. तसेच अन्य कारणास्तव दूरवरच्या आबाल वृद्ध, महिला स्वामी भक्तांना श्रींच्या दर्शनास्तव इच्छा असूनही स्वामींच्या मूळ स्थानी अक्कलकोट येथे येता येथ नाही अशांना दर्शन देण्यासाठी व त्यांची सेवा घेण्यासाठी श्री स्वामीच त्यांच्या गावी येत आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)