आजपासून दिल्लीतील सर्व शाळा बंद, मुख्यमंत्री आतिशींनी सांगितले कारणANI photo
Published on
:
15 Nov 2024, 5:28 am
Updated on
:
15 Nov 2024, 5:28 am
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
दिल्लीच्या शाळेतील ५ वी पर्यंतच्या वर्गांना आजपासून बंद ठेवण्यात येणार आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी या विषयी गुरूवारी माहिती दिली. त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर माहिती देताना सांगितले की, राज्यातील वाढत्या हवा प्रदूषणाची समस्या पाहता पुढच्या आदेशापर्यंत दिल्लीतील इयत्ता ५ वी पर्यंतच्या सर्व शाळा बंद राहणार आहेत. या दरम्यान विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठल्यानंतर केंद्रीय प्रदूषण निरीक्षण संस्था CAQM ने आज (शुक्रवार) पासून दिल्ली-NCR मध्ये GRAP-3 अंतर्गत निर्बंध लादले आहेत.