Published on
:
08 Feb 2025, 5:52 am
Updated on
:
08 Feb 2025, 5:52 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : आम आदमी पक्षासाठी अस्तित्वाची लढाई तर भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत आहेत. येथील प्रारंभीच्या पहिल्या चार फेरीतील मतमोजणीत भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मतमोजणी सुरु असताना नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सूचक पोस्ट केली आहे.
ओमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर 'महाभारत' मालिकेतील एक दृश्य शेअर केले आहे. तसेच यांनी फक्त एवढेच लिहिलं आहे की, 'आपसात आणखी लढा!'. त्यांची ही पोस्ट दिल्लीत काँग्रेस आणि 'आप'ने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या निर्णयाकडे बोट दाखविणार आहे.
प्राथमिक मतमाेजणीत एक्झिट पोल'चे अंदाज खरे!
दिल्लीत ५ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळेल असे सांगण्यात आले होते. मतमोजणीच्या पहिल्या फेर्यांमध्ये एक्झिट पोलचा अंदाज अचूक असल्याचे दिसत आहे.