राजाचे कुर्ले येथील प्रचार सभेवेळी मनोजदादा घोरपडे, धैर्यशील कदम, विक्रमबाबा कदम व इतर.Pudhari Photo
Published on
:
16 Nov 2024, 12:53 am
Updated on
:
16 Nov 2024, 12:53 am
पुसेसावळी : महायुती पाण्याच्या दिशेने जाणारी तर महाविकास आघाडी दुष्काळाच्या दिशेने नेणारी आहे. पुसेसावळी विभागाला त्यांच्या हक्काचे पाणी देणार आहे. आ. बाळासाहेब पाटील यांनी कराड उत्तरच्या जनतेला एवढी वर्षे झुलवत ठेवले आहे. खटाव तालुक्यात येणार्या गावांचा पाणी प्रश्न त्यांना सोडवता आला नाही. ही त्यांची निष्क्रियता आहे. त्यामुळे जनता आता त्यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही, असे टिकास्त्र कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांनी आमदारांवर सोडले.
राजाचे कुर्ले ता. खटाव येथे झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे नेते विक्रमबाबा कदम, धनंजय पाटील, दादासाहेब माने, किशोर माने, प्रदीप माने, शिवाजी माने, रोहित माने उपस्थित होते.
मनोजदादा घोरपडे म्हणाले, विरोधकांना पराभव दिसत असल्याने आम्ही या योजना देऊ, त्या योजना देऊ अशा वल्गना सुरू आहेत. वास्तविक लोकांच्या सुख-दु:खाशी यांना काहीही घेणे देणे नाही. उलट तुम्हाला शासनाच्या विविध योजना मिळाल्या तुमच्या खिशात पैसे येऊ लागले की यांना पोटसुळ उठले. योजना घेवू नका, आधार कार्डवर बोजा चढेल असा प्रचार या बहाद्दरांनी केला. आता तीन काय ते पाच देतील पण हे लबाडा घरचे जेवण आहे हे विसरून चालणार नाही.

निष्क्रिय लोकप्रतिनिधींना घरी बसवा : धैर्यशील कदम
धैर्यशील कदम यांनी आमदारांच्यावर टीका केली. ते म्हणाले, पंचवीस वर्षे आमदार त्यातले अडीच वर्ष मंत्री असणार्या आ. बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात कोणती शाश्वत विकासकामे केली ती सांगावीत. 2014 ते 24 पर्यंत भाजपच्या काळात कोणकोणती विकासकामे झाली ते आम्ही पुराव्यानिशी दाखवतो. त्यांच्या काळात एकही प्रकल्प आला नाही. त्यांच्यासारख्या निष्क्रिय लोकप्रतिनिधींना कराड उत्तरच्या जनतेने आता घरी बसवावे व मनोजदादा घोरपडे यांच्यासारख्या तडफदार व विकासाचे व्हिजन असलेल्या नेतृत्वाला विधानसभेत पाठवावे, असे आवाहन कदम यांनी केले.