उचगावात महिलांना महिलेनेच 24 लाख रुपयांना गंडविलेFile Photo
Published on
:
18 Jan 2025, 12:59 am
Updated on
:
18 Jan 2025, 12:59 am
गांधीनगर : उचगाव (ता. करवीर) येथील अनेक महिलांकडून मुलीच्या उपचारांसाठी आणि इतर कारणे सांगून सुमारे 23 लाख 92 हजार 900 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार अंजना शिवाजी कमलाकर (वय 65, रा. उचगाव पूर्व, ता. करवीर) यांनी दिली. याप्रकरणी गांधीनगर पोलिसांत नजमा नजीर अहमद मुल्ला (वय अंदाजे 35, रा. जानकीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, उचगाव पूर्व, ता. करवीर) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
नजमा हिने मुलीच्या उपचारांसाठी पैशांची गरज आहे, असे सांगून अंजना कमलाकर आणि इतर महिलांकडून मार्च 2021 पासून वेळोवेळी रक्कम घेतली. तसेच काही बँकांमध्ये या महिलांच्या नावे कर्ज काढून त्या कर्जाचे पहिले हप्ते भरून ही कर्जे थकीत ठेवली. काही महिलांचे सोन्याचे दागिने घेऊन कोणत्यातरी बँकांमध्ये ठेवून त्या सोन्यावर कर्ज काढले. अशाप्रकारे विश्वास संपादन करत नजमा मुल्ला हिने आजपर्यंत या महिलांची 23 लाख 92 हजार 900 रुपयांची फसवणूक केल्याबाबतची फिर्याद अंजना कमलाकर यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के करत आहेत.