बिडकीन डीएमआयसीला 36 महिन्यांनंतर मिळणार पाणी:900 मिमी व्यासाची 40 किमी जलवाहिनी टाकण्याचे काम फेब्रुवारीत होणार सुरू
2 hours ago
1
बिडकीन डीएमआयसीला जायकवाडी धरणातून पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी 40 किमी अंतर 900 एमएम व्यासाची जलवाहिनी टाकली जाणार आहे. हे काम फेब्रुवारीत सुरू होणार आहे. 36 महिन्यांत जलवाहिनीचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. 70 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारायचा आहे. म्हणजेच डीएमआयसीत पाण्यासाठी तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसेच नवीन कंपन्यांना बांधकाम, पिण्याच्या पाण्यासाठी खासगी स्रोत, विहिरी आणि एमआयडीसीकडून मिळणारे 10 एमएलडी पाण्यावर निर्भर राहावे लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. बिडकीन औद्योगिक वसाहतीत देश-विदेशातील 68 उद्योजकांनी नवीन कंपनी स्थापन करण्यासाठी 2,076.86 एकर जमीन घेऊन यामध्ये 56,320 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामध्ये टोयोटा, अथर, लुब्रीझोल, जीएसडब्ल्यू यासारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. 5 उद्योजकांनी कंपन्यांच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे, तर उर्वरित 65 कंपन्यांकडूनही कंपन्यांच्या बांधकामासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत. याबरोबर व्यावसायिक, निवासी, सार्वजनिक, निमसार्वजनिक सेवासुविधांसाठी जमीन राखीव ठेवण्यात आली आहे, तर एकूण 8 हजार एकर जमिनीवर विकास करण्यात येणार आहे. सर्वात पहिले येथे मूलभूत सेवासुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. रस्ते विकास करण्यात आला आहे. स्वतंत्र पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्याशिवाय येथील विकासाला गती मिळणार नाही. यासाठी नऊशे एमएम व्यासाची जलवाहिनी जायकवाडी धरण ते बिडकीन औद्योगिक वसाहतीपर्यंत टाकण्याचे निश्चित केले आहे. सत्तर एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे काम प्रस्तावित आहे. 319 कोटींची तरतूद जायकवाडी ते बिडकीन औद्योगिक वसाहतींपर्यंत जलवाहिनी टाकणे व जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाचा समावेश आहे. यासाठी 319 कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे. डीएमआयसीत उद्योगाला मुबलक मिळेल पाणी सध्या बिडकीन आणि शेंद्रा डीएमआयसीला प्रत्येकी 10 एमएलडी पाणी मिळते. नवीन कंपनी बांधकाम, पिण्याच्या पाण्याची मागणी यातून पूर्ण होते. प्रॉडक्शनपर्यंत70 एमएलडी जलवाहिनीचे काम पूर्ण होईल.-पी. डी. मलिकनेर, व्यवस्थापकीय संचालक, एमआयटीएल (आॅरिक) बिडकीन औद्योगिक स्थिती एकूण 68 उद्योजकांनी जागा घेतली आहे. त्यातील 5 कंपनीचे बांधकाम सुरू झाले आहे, तर उर्वरित मंजुरीच्या विविध टप्प्यात असलेल्या 65 उद्योगांचा समावेश आहे. या 68 उद्योजकांनी 56,320 कोटींची गुंतवणूक केली आहे. यातून 25,345 रोजगार उपलब्ध होणार आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)