Republic Day 2025 | प्रजाकसत्ताक दिन सोहळ्यासाठी कामेरीच्या सरपंचांना विशेष निमंत्रणfile photo
Published on
:
18 Jan 2025, 7:46 am
Updated on
:
18 Jan 2025, 7:46 am
इस्लामपूर : Republic Day 2025 | कामेरी (ता. वाळवा) गावचे लोकनियुक्त सरपंच रणजित पाटील यांना २६ जानेवारी रोजी प्रजाकसत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी शासनाकडून विशेष निमंत्रीत करण्यात आले आहे. राज्यातील ८ सरपंचांना हा सन्मान मिळाला आहे. त्यात रणजित पाटील यांचा समावेश आहे.
राज्यातील जी गावे हर घर जल प्रमाणित झाली असून त्या गावांमधील पाणी पुरवठा योजना ग्रामस्थांना हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत. तसेच या योजना ग्रामपंचायत पाणी समितीमार्फत सक्षमपणे चालविल्या जात आहेत. अशा पाणी पुरवठा समितीमधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांमधून राज्यातील ८ सरपंचांना या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. प्रजाकसत्ताक दिनी कर्तव्यपथ येथे पार पडणाऱ्या भव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा मान या सरपंचांना मिळणार आहे. सिंधुदुर्ग, नंदुरबार, अकोला, चंद्रपूर, धुळे, अमरावती, गोंदिया या जिल्ह्यातील सरोंचांचा यामध्ये समावेश आहे. सांगली जिल्ह्यातून रणजीत पाटील यांची एकमेव निवड झाली आहे. निवड झालेले सरपंच व सोबत एका व्यक्तीचा दिल्लीपर्यंतचा प्रवास, राहणे व जेवणाचा खर्चही शासन करणार आहे.