Published on
:
18 Jan 2025, 7:44 am
Updated on
:
18 Jan 2025, 7:44 am
पालघर : मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा सुरेश अनाजी वाघ (४९) वर्ष राहणार पवारपाडा पोस्ट पोशेरा तालुका मोखाडा जिल्हा पालघर याला विभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशा अन्वये ठाणे, पालघर आणि नाशिक या तीन जिल्ह्यातून ६ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. त्याच्यावर भा.दं. वि. क. ३५३ अन्वये लोकसेवकांवर हल्ला करणे, भा. दं. वि. क. ३९५ अन्वये दरोडा तसेच भा. दं. वि. क. ३२४ अन्वये घातक हत्याराने इच्छापूर्वक दुखापत पोहचवणे या प्रकारचे दोन आशा प्रकारच्या चार गंभीर गुन्ह्यांसह भा. दं. वि. कलम ५०४, ३४१, ३६४, ३, २५(१), कलम ३७ (१), (ड), १३५, ५०६ अन्वये मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत.
मोखाडा पोलीस ठाणे / भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२,३५१ (२) (३) (५) प्रमाणे गुन्हे दाखल असल्याने सदर इसमास कायद्याचा धाक राहिला नाही. त्याच्याकडून मोखाडा तालुक्यात राहणाऱ्या सामान्य नागरिकांना धाकदाखवून भीतीचे साम्राज्य पसरविले जातं आहे.
तो समाजात सातत्याने धोकादायका व्यक्ती बनला आहे. त्यामुळे सुरेश वाघ विरुद्ध मोखाडा पोलीस ठाण्यात विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत उपविभागीय दंडाधिकारी जव्हार यांच्या न्यायालयात सुरेश वाघ याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चेकलम ५६ (१), (अ) (ब) नुसार प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार सुरेश अनाजी वाघ राहणार पवारपाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर याला उपविभागीय दंडाधिकारी जव्हार यांनी दिनांक २ जानेवारी २०२५ रोजी हद्दपारीचे आदेश पारीत केले आहेत. त्यानुसार त्याला पालघर, नाशिक, ठाणे या तीन जिल्ह्यातून सहा महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आले आहे.
सुरेश अनाजी वाघ रा. पवारपाडा हा पालघर जिल्ह्यात कुठेही आढळून आल्यास त्याची खबर मोखाडा पोलीस ठाण्यात देण्याचे आवाहन मोखाडा पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच यापुढे मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता रहावी, सर्व सामान्य नागरिकांना गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या लोकांकडून त्रास होऊ नये यासाठी मोखाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे अभिलेखावर ज्या इसमा विरुद्ध दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशा विरुद्ध हद्दपारिचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.