छत्रपती संभाजीनगरात अडीच हजार रोहिंग्यांचे वास्तव्य:किरीट सोमय्यांचा दावा, जिल्हाधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची पडताळणी करावी

3 hours ago 1
देशभर गाजत असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा आता थेट छत्रपती संभाजीनगरपर्यंत येऊन ठेपला आहे. जिल्ह्यात 10 हजार 68 बांगलादेशी नागरिकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत, तर संभाजीनगर शहरात 2 हजार 448 तर सर्वाधिक 4 हजार 730 बांगलादेशी नागरिक हे एकट्या सिल्लोड तालुक्यात वास्तव्यास आहेत. त्यांनी जन्म प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. त्यांच्या प्रत्येक अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करावी, अशी मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. प्रमाणपत्रांची तपासणी करू जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी नागरिकांनी अर्ज केले असून, त्याची माहिती त्यांनी मागितली होती. याबाबत चौकशी करण्याचे त्यांनी सांगितले. सर्व कागदपत्रांची पडताळणी करून दोषी आढळल्यास कारवाई करू, असे त्यांना सांगितले. -दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी. शुक्रवारी माजी खा. सोमय्या यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली. सोमय्या म्हणाले की, २०२४ मध्ये जन्म प्रमाणपत्र देण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून लक्ष घालण्यास सांगितल्याचे सोमय्या म्हणाले. मालेगावमधील घुसखोरांची दिली यादी मालेगावात घुसखाेर बांगलादेशी, राेहिंग्या यांनी जन्माचा दाखला मिळवण्यासाठी खाेटी कागदपत्रे सादर केली आहेत, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या वारंवार करत आहेत. त्यांनी शुक्रवारी बनवेगिरी करून दाखले घेणाऱ्या ११० जणांची यादी छावणी पाेलिसांकडे दिली. सरकारी यंत्रणेची फसवणूक करणाऱ्या या घुसखाेरांवर गुन्हे दाखल करावेत, असा तक्रार अर्जही दिला आहे. आतंकी संघटनेच्या नेत्याचे पाठबळ असल्याचा दावा घुसखाेरांना एका आतंकी संघटनेचा नेता व बांगलादेश - प. बंगाल सीमेवरील दलालाचे पाठबळ आहे, असे सांगत माझी मोहीम व्हाेट जिहाद समर्थकांना खुपत असणारच अशी टीकाही सोमय्यांनी खासदार डाॅ. शाेभा बच्छाव यांच्यावर केली. 1 लाख रोहिंग्यांचे अर्ज किरीट सोमय्या म्हणाले की, नोव्हेंबर 2023 मध्ये संसदेने ज्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही त्या लोकांसाठी एक कायद्यात सुधारणा आणली. परंतु या तरतुदीमुळे महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत बांगलादेशी आणि रोहिंग यांना भारतातील जन्म प्रमाणपत्र देण्यात आले. त्यासाठी काही राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी आणि बांगलादेश पश्चिम बंगाल बॉर्डरवरील जे एजंट आहे त्यांच्यासोबत एक षडयंत्र बनवले. त्यानुसार एक लाख बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना जन्म प्रमाणपत्र देण्याबाबत विविध जिल्हाधिकाऱ्यांकडे असे अर्ज आलेले आहे

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article