Published on
:
18 Jan 2025, 7:58 am
Updated on
:
18 Jan 2025, 7:58 am
खानिवडे : Palghar News | वसई- विरार, मिरा-भाईंदर शहरात महिलांवरील अत्याचारात २०२३ च्या तुलनेत वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत बलात्काराचे गुन्हे ४७ ने तर विनयभंगाचे गुन्हे ७७ ने वाढले आहेत. महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी विविध प्रकारे उपाययोजना केल्या जात असल्या तरीअत्याचाराचे प्रमाण कमी झालेलेनाही. २०२३ मध्ये वसई, भाईंदर मध्ये बलात्काराच्या आणि ३६० विनयभंगाच्या ४७७ घटना घडल्या होत्या. २०२४ मध्ये त्यात वाढ झाली आहे. २०२४ या वर्षात बलात्काराच्या ४०७ तर विनयभंगाच्या ५५५ घटना घडल्या आहेत.
प्रेमाच्या जाळ्यात ओढून, फसवणूक करून, धमकावून, अश्लिल सामूहिक बलात्काराच्या प्रमुख घटना प्रतिष्ठितांकडून बलात्कार जुलै २०२४ १२ ऑगस्ट २०२४ शिक्षक- अमित दुबे या शिक्षकाने ९ वी शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर ५ महिन्यांपासून बलात्कार छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल २५ सप्टेंबर २०२४ करून बलात्कार करण्यात आले आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या विनयभंगातही वाढ झाली आहे.
छेडछाड करणे, पाठलाग करणे, अश्लील शिविगाळ करणे, अश्लील संदेश पाठवणे अशा प्रकरणातही इतर कलमांप्रमाणे विनयभंगाचे गुन्हे दाखल प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले जात इंस्टाग्राम हे तरुण मुलांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे मात्र याच इन्स्टाग्रामवरून बहुतांश गुन्हे घडले आहे. शिक्षक, डॉक्टर राजकारणी अशा प्रतिष्ठित लोकांकडूनही बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. यामुळे मिरारोड, भाईंदर, वसई-विरार, नालासोपारा शहरे महिला वर्गासाठी असुरक्षित असल्याचे दिसत आहे.
सामूहिक बलात्काराच्या प्रमुख घटना
जुलै २०२४: शिकवणी शिक्षक- विरार पूर्वेच्या मनवेल पाडा येथील प्रमोद मोर्या या ईशात कोचिंग क्लासेस चालविणाऱ्याकडून १३ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ.
१२ ऑगस्ट २०२४: शिक्षक- अमित दुबे या शिक्षकाने ९ वी शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर ५ महिन्यांपासून बलात्कार
२ सप्टेंबर २०२४: मिरा रोडमध्ये अल्पवयीन मुलीवर तिघांचा सामूहिक बलात्कार
९ सप्टेंबर २०२४: नालासोपारा पूर्वेच्या गणेश आगमन सोहळा पाहण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार
२५ सप्टेंबर २०२४: डॉक्टर- नालासोपारा मधील योगेंद्र शुक्ला या डॉक्टरकडून अल्वपयीन मुलाचे ८ वर्षांपासून लैंगिक शोषण
२३ सप्टेंबर २०२४: नालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलीवर अनिस शेख आणि त्याचा मित्र झियान या दोघांकडून सामूहिक बलात्कार
२४ सप्टेंबर २०२४: राजकारणी भाजपाचा वसई विरार जिल्हाउपाध्यक्ष संजू श्रीवास्तवकडून २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार
२३ ऑक्टोबर २०२४: १६ वर्षाच्या मुलीवर तिच्या वर्गमित्रासह दोघांना धमकावून बलात्कार केला तसेच तिची अश्लील छायाचित्रे काढून तिला धमकावले आहे.