दोन गटांत हाणामार्याpudhari
Published on
:
18 Jan 2025, 7:50 am
Updated on
:
18 Jan 2025, 7:50 am
श्रीरामपूर शहरातील वार्ड नं.2 मध्ये घासगल्ली भागात काल सायंकाळच्या सुमारास दोन टोळक्यात बेदम हाणामार्या होवून दोघांना चाकुने वार करून जबर जखमी करण्यात आले. तर एकाने त्याच्या जवळील कटट्यातुन हवेत गोळीबार केला. यात दोन्ही बाजूनी एकमेकांना बेदम मारहाण करण्यात आली. हवेत गोळीबार केल्यामुळे तसेच दोन टोळक्यांतील मारामार्यांमुळे परिसरात घबराट पसरली आहे.
राहाता तालुक्यात इस्तेमा कार्यक्रमात वादावादी झाली होती. ते भांडण त्याच परिसरात मिटविण्यात आले. पुन्हा गैरसमज नको म्हणून शहरातील वार्ड नं.2 मध्ये घासगल्ली भागातमिटवा - मिटवी करत असतानाच दोन्ही टोळके समोरासमोर आल्याने भांडणे मिटविण्याऐवजी हाणामार्या झाल्या. यात चाकूने वार करण्यात आले असून यात कय्युम कासम शेख, आयान जमील पठाण, मोहसीन शकील शेख हे तिघे जबर जखमी झाले आहेत. यावेळी एकाने हवेत गोळीबार केल्याची माहिती घटनास्थळाजब्लिन नागरिकांनी केली मात्र पोलिसांकडून त्यास दुजोरा मिळू शकलं नाही. या तिघाही जखमींवर येथील साखर कामगार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून एकास जबर वार करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस निरीक्षक नितीन देशमुख हे पोलीस फोजफाटा घेवून दाखल होताच पळापळ झाली.
याप्रकरणी पोलीस तपास करत असून एक टोळके घासगल्ली, वार्ड नं.2 तर दुसरे अशोकनगर परिसरातील असल्याचे समजते. मिटविणारा व बोलावणारा कोण होता ? हे पोलीस शोधत आहेत. दरम्यान नक्की हवेत गोळीबार झाला का ? गोळीबार गावठी कट्ट्यातून झाला का छर्याच्या बंदूकीतून झाला याची चौकशी पोलीस करीत आहेत.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची कोणतीही नोंद करण्यात असलेली नव्हती.