सैफ अली खानच्या ऑपरेशसाठी लाखोंचा खर्च, विमा कंपनीकडे कॅशलेस उपचाराची मागणी, रक्कम अखेर समोर

3 hours ago 1

Saif Ali khan Operation Bills: अभिनेता सैफ अली खान मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल आहे. एका हल्लेखोराने अभित्यानेवर चाकूने सहा वार केले आहे. हाणामारीमध्ये अभिनेत्यावर झालेले दोन वार गंभीर असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. सैफच्या मणक्यात हल्लेखोराने वार केल्यानंतर चाकूचा 2.5 इंचचा तुकडा त्याच्या शरीरात राहिला. अशात शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी चाकूचा तुकडा काढला आहे. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सैफ सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे. हल्ल्यानंतर झालेल्या शस्त्रक्रियेसाठी सैफला मोठी किंमत मोजावी लगणार आहे. रुग्णालयाचं बिल देखील समोर आलं आहे. अभिनेत्याने आरोग्य विम्याच्या माध्यमातून कॅशलेस उपचार केल्याची माहिती देखील समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, 16 जानेवारी रोजी कॅशलेस उपचारासाठी विमा कंपनीशी खान कुटुंबियांचं बोलणं झालं होतं. अभिनेत्याला शस्त्रक्रियेसाठी एका रुममध्ये ठेवण्यात आलं होतं. रिपोर्टनुसार, 16 जानेवारी ते 21 जानेवारी पर्यंत सैफवर उपचार होणार आहे. 5 दिवस अभिनेता रुग्णालयात राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

रिपोर्टनुसार, सैफ अली खानच्या उपचारासाठी 35 लाख 98 लाख 700 रुपये खर्च येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यातील 25 लाख रुपये देण्याची कबुली विमा कंपनीने दिली आहे. तर राहिलेला खर्च खुद्द सैफ अली खान याला स्वखर्चातून करावा लागणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याची चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले डॉ. नितिन डांगे?

लिलावती रुग्णालयाचे डॉ. नितिन नारायण डांगे शुक्रवारी म्हणाले, ‘सैफ अली खान याची प्रकृती आता स्थिर आहे. आता तो चालू देखील शकतो. कोणतीच अडचण नाही शिवाय अभिनेत्याला जास्त वेदना देखील होत नाही…’ अभिनेत्याला लवकरच रुग्णालयातून सुट्टी मिळेल असं देखील सांगण्यात येत आहे.

अभिनेत्याला आयसीयू मधून नॉर्मल रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. सैफच्या प्रकृतीचा अंदाज घेऊन त्याला रुग्णालयातून सुट्टी मिळेल असं देखील सांगण्यात येत आहे. पण अभिनेत्याल दोन आठवडे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article