उत्तर मध्य महाराष्ट्रात भरणार हुडहुडी:तापमानात होणार तीव्र घट, थंडीच्या लाटेचा हवामान विभागाकडून इशारा
2 hours ago
1
उत्तर भारतातील हवामान थंड झाल्यामुळे महाराष्ट्रातही थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होणार आहे. राज्यभरातील अनेक भागात तापमान 13 अंशच्या खाली गेले आहे. पुढील काही दिवस राज्यात कोरडे वातावरण असले तरी नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि घाट भागात थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नाशिक जिल्हा, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर जिल्हा, पुणे जिल्हा आणि पुणे घाट परिसरात 28 नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबर रोजी थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला असून सतर्कतेचा इशाराही दिला आहे. दरम्यान, 26 नोव्हेंबरच्या रात्री अहिल्यानगरमध्ये 9.7 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. यंदाच्या हिवाळ्यातील राज्यातील सर्वांत कमी नोंद ठरली. मागील आठवड्यात हेच तापमान 12 ते 14 अंश दरम्यान होते. संध्याकाळ आणि रात्री थंडीच्या लाटेमुळे तापमानात मोठी घट दिसून येते. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भातील काही भाग आणि उत्तर महाराष्ट्रात पहाटे गारठा जास्त वाढला असून 8-10 डिग्री सेल्सियसपर्यंत तापमानाची नोंद झाली आहे. तर काही ठिकाणी 12 अंश डिग्री सेल्सियसपर्यंत तापमान नोंदवण्यात आले. थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार
दरम्यान, मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात पारा घसरला आहे. रात्रीपासून थंड वारे वाहू लागले आहेत. या सोबतच आता दिवसा देखील थंडी जाणवू लागली आहे. पहाटेच्या सुमारास तापमानात मोठी घट होत आहे. नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्यांचा आधार घेत आहेत. पुढील काही दिवसांनत थंडी आणखी वाढणार आहे. डिसेंबरमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता
पुढील काही दिवसांत तापमानात चढ-उतार होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी थंडी वाढण्याची अपेक्षा असताना ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे. तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरात थंडीची लाट येण्याचा अंदाज हवमान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)