ओरोस : येथे मंत्री ना. नितेश राणे यांचे अभिनंदन करताना जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर. सोबत अन्य.pudhari photo
Published on
:
23 Jan 2025, 1:10 am
Updated on
:
23 Jan 2025, 1:10 am
वेंगुर्ले ः वेंगुर्ले उभादांडा नवाबाग येथील खाडीतील गाळ काढण्यात यावा, अशी मागणी जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री ना.नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मंत्री ना.नितेश राणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून प्रथमच सिंधुदुर्ग दौर्यावर आले होते. यावेळी ओरोस येथे सचिन वालावलकर यांनी मंत्री राणे यांची भेट घेतली. वेंगुर्ले तालुक्यातील वेंगुर्ले उभादांडा नवाबाग येथील खाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला असून नवाबाग खाडीचे खाडीपात्र पुर्णतः गाळाने भरल्याने येथील स्थानिक ग्रामस्थ व मच्छीमारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खाडीपात्र गाळाने भरल्याने वेंगुर्ले बंदरातून येणार्या स्थानिक मच्छीमारांच्या बोटी, नौका खाडीपात्रामध्ये येण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. तसेच समुद्राच्या वाढत्या पाणीपातळीने आजुबाजूच्या क्षेत्राची धूप होत असून शेती बागायतींचेही नुकसान होत आहे. तसेच या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटनदृष्टया सुद्धा पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने बोटींग सुविधेद्वारे पर्यटन व्यवसाय करण्यासही अडचणी निर्माण होत आहेत.
सदर खाडीतील गाळ काढल्यास या भागामधील मच्छीमारी व्यवसाय तसेच पर्यटन व्यवसायास मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार असून या भागातील होणारे नागरिकांचेही नुकसान टळणार आहे. या कामास तात्काळ मंजूरी देऊन निधी उपलब्ध करून दयावा, अशी मागणी वालावलकर यांनी केली आहे.