कर्णपुऱ्यात एकाच छताखाली घडते जैन समाजबांधवांच्या 12 कुलदेवींचे दर्शन‎:2010 मध्ये गुप्तीनंदी महाराजांच्या प्रेरणेतून साकारले मंदिर

2 hours ago 1
राजाबाजार येथील खंडेलवाल दिगंबर जैन‎पंचायतीअंतर्गत कर्णपुरा येथे १२ देवींचे‎मंदिर उभारण्यात आले आहे. २०१० मध्ये‎आचार्य गुप्तीनंदी महाराज यांच्या प्रेरणेतून‎हे मंदिर उभे राहिले. खंडेलवाल पंथाच्या‎विविध १२ कुलदेवींची ही मंदिरे आहेत.‎कुलदेवीच्या दर्शनासाठी जैन बांधवांना‎लांबचा प्रवास करून जावे लागत होते.‎म्हणून समाजाने हे मंदिर साकारले.‎ नोव्हेंबर २०१० मध्ये या सर्वांची विधिवत‎प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मंदिराला‎विस्तारीकरण करणे शक्य नाही. कारण,‎मंदिराबाहेरील संपूर्ण जागा छावणी‎परिषदेची आहे. मात्र, अलीकडेच मंदिरात‎सोलार प्रकल्प लावण्यात आल्याचे‎अध्यक्ष महावीर पाटणी यांनी सांगितले.‎ प्रत्येक वेळी देवीच्या दर्शनासाठी‎राजस्थानात जाणे शक्य नाही. त्यामुळे‎समाजाने शहरातच मंदिर निर्माण‎करण्याचा संकल्प घेतला अन् हे मंदिर‎साकारले गेले. देशभरातील हे एकमेव‎मंदिर आहे. जैन समाजात ८४ गोत्रे आहेत.‎प्रत्येक देवी ही किमान ६ ते ८ गोत्रांची देवी‎आहे. या सर्व भाविकांना या मंदिरामुळे‎कुलदेवीचे दर्शन शहरातच घडते.‎ साधारण १९५५ मध्ये या ठिकाणी‎सुमतीसागर महाजरांचे समाधी झाली‎होती. त्यानंतर सुमतीसागर महाराज आणि‎बुद्धिसागरजी महाराज यांच्या पादुका या‎ठिकाणी ठेवल्या होत्या. खंडेलवाल‎दिगंबर जैन समाज हा मूळचा राजस्थानी‎समाज आहे. या समाजाच्या प्रत्येक‎गोत्राचे कुलदैवत राजस्थानात आहे. मात्र,‎या देवी मंदिरात प्रतिकुलदैवतच‎भाविकांसाठी उपलब्ध झाले. संपूर्ण‎संगमरवरात हे मंदिर निर्माण करण्यात‎आले. २०१५ मध्ये मुनिश्री प्रसन्नसागरजी‎महाराज व पीयूषसागरजी महाराज यांच्या‎सान्निध्यात या ठिकाणी सर्वतोभद्र‎पार्श्वनाथ भगवंताची स्थापना केली होती.‎येथे दररोज भगवंताचा पंचामृत अभिषेक‎व मातेची शृंगार पूजा,आरती करण्यात येते.‎क्षेत्रपाल बाबा आणि धरर्णेंद्र देव यांचीही‎स्थापना केली आहे असे मंदिराचे संयाेजक‎प्रमोद पांडे यांनी सांगितले.‎ या देवींची करण्यात‎आली प्राणप्रतिष्ठा‎ ‎ लोसीन माता, लोहिणी‎माता, नांदणी माता,‎सैतली माता, अमन माता,‎पद्मावती माता, चक्रेश्वरी‎माता, मातणी माता,‎जमवाई माता, औरली‎माता, जीन माता, चौथ‎माता यांची या ठिकाणी‎प्राणप्रतिष्ठा करण्यात‎आलेली आहे. जैनेतर‎बांधवही या ठिकाणी‎दर्शनासाठी येतात, असे‎पांडे म्हणाले.‎

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article