Saif Kareena Big Dicision: सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी चाकू हल्ल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. पापाराझींसोबत झालेल्या एका बैठकी दरम्यान सैफ आणि करीना यांनी घेतलेला निर्णय त्यांच्या स्टाफने सांगितला आहे. मुलाच्या सुरक्षेसाठी देखील करीना – सैफ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सध्या सर्वत्र करीना – सैफ यांची चर्चा रंगली आहे. रिपोर्टनुसार, करीना कपूरच्या टीमने पापाराझींची भेट घेतली आणि त्यांना सैफ आणि करिनाच्या निर्णयाबद्दल माहिती दिली.
करीना आणि सैफ यांचा मोठी निर्णय
मीडिया रिपोर्ट्सनुसार, करीना कपूरच्या पीआर मॅनेजरने पापाराझींना भेटून या निर्णयाची माहिती दिली. सैफ आणि करिनाची इच्छा आहे की पापाराझींनी तैमूर आणि जेहचा कोणताही फोटो क्लिक करू नये. तसेच ते कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गेल्यास त्यांच्या मागे पापाराझींनी जाऊ नये. 28 जानेवारी रोजी वांद्रे येथील कार्यालयात ही बैठक झाली.
यासोबतच पीआरने सांगितलं की, करीना आणि सैफ म्हणाले की, ‘ते दोघांचे फोटो क्लिक करू शकतात. ते एखाद्या कार्यक्रमाला जात असतील तर. मात्र त्यांनी घराबाहेर उभे राहू नये. तसेच, करीना आणि सैफचे येण्या-जाण्याचे फोटो क्लिक करू नका. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे मॅनेजरने सांगितलं आहे.
16 जानेवारी रोजी झालाय हल्ला…
16 जानेवारीच्या मध्यरात्री सैफवर घरात घुसलेल्या चोराने चाकूने हल्ला केला. त्यानंतर सैफला मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे सैफवर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात आली. आता सैफ याची प्रकृती स्थिर आहे. शिवाय अभिनेत्याने कामाला देखील सुरुवात केली आहे. हल्ल्यानंतर नुकताच एका कार्यक्रमात अभिनेता दिसला.